मुंबई यांच्या NHI डॉट कॉम:
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे यंदा आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ दिनानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची आणि सर्वांसाठी खुली बुध्दिबळ स्पर्धा-महोत्सव २० व २१ जुलै दरम्यान आरएमएमएस वातानुकुलीन हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आला आहे. आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना रोख पुरस्कार आणि एकूण १५० पुरस्कार दिले जाणार आहेत.
. शालेय क्रीडा चळवळीच्या व्यस्ततेमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर खास खुल्या गटातील बुद्धिबळपटूच्या आग्रहास्तव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सर्वांसाठी खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे २१ जुलै रोजी ३० चषक आणि एकूण रोख रु.४१,०००/- पुरस्कारासह आयोजन करण्यात आले आहे. खुल्या गटात प्रथम पुरस्कार रुपये दहा हजार व चषक दिला जाणार आहे. तसेच एकूण १२० चषक पुरस्कारासह विविध ८ वयोगटाच्या बुध्दिबळ स्पर्धा २० जुलै रोजी होणार आहेत. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हाट्सअप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे २९ जूनपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.
********************************************