मुंबई, : वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील वैद्यकीय पथकाने जीवघेण्या ऑर्टीक म्हणजेच हृदयातून उगम पावणाऱ्या सर्वात मोठ्या धमनीतील दूरवस्थेवर उपचार करण्यासाठी ‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ (FET) तंत्रज्ञानाचा वापर करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. प्रख्यात हृदय शल्यतज्ज्ञ डॉ. गुलशन रोहरा यांनी या जटील शस्त्रक्रिया प्रक्रियेचे नेतृत्व केले. या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या हृदयातून उगम पावणाऱ्या सर्वात मोठ्या धमनीतील गंभीर दोष दूर करण्यासाठी नावीन्यपूर्ण शस्त्रक्रियेचा समावेश होता.
हृदयातून उगम पावणाऱ्या सर्वात मोठ्या धमनीला आलेला फुगवटा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले 50 वर्षीय रुग्ण रिझवान सय्यद वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथे आले. रुग्णाची स्थिती आणि लक्षणे पाहता सय्यद रिझवान यांच्या हृदयातील महाधमनी फुटू शकते आणि उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असे स्पष्ट होत होते. रुग्णाची परिस्थिती आणि तातडीने उपचाराची गरज ओळखून डॉ. गुलशन रोहरा यांनी डॉ. विशाल न. पिंगळे आणि वैद्यकीय पथकासह रिझवान सय्यद यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईत क्वचितच वापरल्या जाणाऱ्या ‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ (FET) तंत्रज्ञानाची निवड केली.
‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ प्रक्रिया एक अत्याधुनिक पद्धत असून यात पारंपरिक खुली शस्त्रक्रिया आणि आधुनिक एंडोव्हस्कुलर तंत्राचा एकत्रित वापर केला जातो. महाधमनीची झडप स्थिर करण्यासाठी आणि ही झडप फाटू नये, जीवघेणा रक्तस्राव होऊ नये, यांसारखी पुढे उद्भवू शकणारी गुंतागुंत टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण रक्तवाहिन्या तसेच महाधमनी बदलणे आवश्यक आहे.
प्रक्रियेतील ठळक मुद्दे
● कार्डिओपल्मनरी बायपास (CPB): हृदय आणि फुफ्फुसांची कामे तात्पुरत्या स्वरूपात करण्यासाठी वापरल्या जाते.
● सर्क्युलेटरी अरेस्ट: मेंदूवगळता संपूर्ण शरीरात 40 मिनिटांसाठी रक्तपुरवठा बंद व्हावा म्हणून रुग्णाच्या शरीराचे तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आणले जाते, जेणेकरून रक्तस्राव होऊ नये.
● स्टेंट डिप्लोयमेंट: स्टेंटसह विशेष ग्राफ्ट (एव्हिटा निओ) महाधमनीमध्ये काळजीपूर्वक व सुरक्षितरित्या बसवले जाते. उल्लेखनीय म्हणजे एव्हिटा निओ एफईटी हायब्रीड ग्राफ्ट वापरणारे डॉ. गुलशन रोहरा भारतातील पहिलेच हृदय शल्यतज्ज्ञ आहेत.
● रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करणे: मेंदुसह महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर रक्ताभिसरण पुन्हा सुरू करणे.
रिझवान सय्यद यांच्यावरील एफईटी शस्त्रक्रिया सुमारे 11 तास चालली. वैद्यकीय पथकाने अचूकतेने आणि कौशल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण केली. गुंतागुंतीची परिस्थिती असूनही रुग्णाला आपली पूर्वावस्था लवकर प्राप्त झाली. शस्त्रक्रियेनंतर नजीकच्या दिवसांत रुग्णामध्ये कोणतीही न्युरोलॉजिकल गुंतागुंत किंवा समस्या आढळून आली नाही.
रुग्णावर शस्त्रक्रिया करताना वापरण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जटीलतेबद्दल डॉ. रोहरा म्हणाले की, ” महाधमनीविषयीच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होते. रूग्णावरील यशस्वी शस्त्रक्रिया उच्च गुणवत्ता आणि जीव वाचवण्यासाठी अत्याधुनिक उपचार वापरण्याची आमची वचनबद्धता दाखवून देते.”
वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील केंद्र प्रमुख डॉ. वीरेंद्र चौहान यांनी या यशाबद्दल माहिती देताना सांगितले की, ” वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथे दाखल झालेल्या रुग्णावर उपचार करताना ‘ फ्रोझन एलिफंट ट्रंक ‘ तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर महाधमनीशी संबंधित गंभीर स्थितीचा सामना करण्याच्या आमच्या क्षमतेमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचे दाखवतो. ही प्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील सीमा पार करण्यासाठी आमच्या रुग्णालयाच्या समर्पित सेवेचे उदाहरण आहे. तसेच यातून रुग्णांना उपलब्ध असलेली सर्वात प्रभावी आणि नावीन्यपूर्ण उपचार प्रदान करण्याबाबतची आमची वचनबद्धता दिसून येते.”
वोकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथील डॉ . अपर्णा कौशिक , कार्डिआक ऍनेस्थेटिस्ट यांनी सांगितले की, ” महाधमनी विषयीच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीवर उपचार करण्यासाठी वापरले गेलेले ‘फ्रोझन एलिफंट ट्रंक’ तंत्रज्ञान शस्त्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारी घटना आहे. योग्य ते परिणाम साध्य करणारी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया प्रक्रिया पूर्णत्वास नेण्याची आमची क्षमता हे सूक्ष्म स्तरावरील नियोजन, वैद्यकीय पथकाचा एकत्रित प्रयत्न आणि आमच्याकडे असलेल्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. हे प्रकरण केवळ आमच्या वैद्यकीय पथकाच्या क्षमतेवर प्रकाश टाकत नसून भारतातील हृदयविषयक शस्त्रक्रियांमध्ये नाव मानदंड स्थापित करते.”
या प्रकरणातील रुग्णाच्या कुटुंबाने वैयक्तिक आव्हाने असूनही वोकहार्ट हॉस्पिटलमधील तज्ञांवर आशेने विश्वास ठेवला आणि या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा पाठपुरावा करण्याचा साहसी निर्णय घेतला. रुग्ण रिझवान सय्यद यांनीही याबाबत स्वतःची कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, ” मी डॉ. रोहरा आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानतो. त्यांच्या वैद्यकीय कौशल्य आणि समर्पण भावनेने मला आज नवे जीवनदान मिळाले आहे. मी माझ्या पायावर उभा असून, आता प्रत्येक दिवस आयुष्यात मजबुती प्रदान करणारा ठरत आहे. हा अनुभव जीवन बदलणारा आहे आणि या वैद्यकीय पथकामुळेच मला दुसऱ्यांदा हे जीवन जगण्याची संधी मिळाली आहे.”
या जटील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणात मिळालेले यश रुग्णसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी हॉस्पिटल समर्पण भावनेने काम करत असल्याचा पुरावाच आहे.