मुंबई :NHI news agency
अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत डीपीवायए हायस्कूलचा राष्ट्रीय दर्जाचा ज्युनियर कॅरमपटू कौस्तुभ जागुष्टेला विवा कॉलेजचा राष्ट्रीय दर्जाचा ज्युनियर कॅरमपटू भव्या सोळंकीने ८-४ असे चकविले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. भव्याने डावाच्या मध्यापर्यंत ६-० अशी आघाडी घेत अखेर ४ गुणांच्या फरकाने बाजी मारली. अन्य सामन्यात चेंबूर हायस्कूलचा मयुरेश पवार, विवा कॉलेजचा जोनाथन बोनल यांनी विजयीदौड केली.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात १०-० असा दमदार प्रारंभ करणाऱ्या पोद्दार अकॅडमी-मालाडच्या प्रसन्ना गोळेला मयुरेश पवारने निर्णायक क्षणी अचूक खेळ केला आणि मयुरेशने १८-१० असा विजय संपादन केला. प्रथमपासून सरळ जाणाऱ्या सोंगट्या सहज पॉकेटमध्ये टाकत जोनाथन बोनलने बलाढ्य ध्रुव भालेरावला २५-० असा नील गेम दिला. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर, सचिन शिंदे, अविनाश महाडिक हे पंचाचे कामकाज करीत आहेत.
********************