Mumbai/nhi news agency
यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींची एकूण आठ वयोगटाची बुध्दिबळ स्पर्धा १ जून रोजी आरएमएमएस हॉल, परेल, मुंबई-१२ येथे १२१ खेळाडूंमध्ये रंगणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना गोविंदराव मोहिते मित्र मंडळ-उदय पवार, मंगेश चिंदरकर, राजन राणे, अजित आचरेकर आदींतर्फे एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत. गेली पाच दशके क्रीडा व कामगार क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी उमेदीच्या काळात कबड्डी व व्यायाम प्रकारात उल्लेखनीय खेळ केला होता. क्रीडापटूना प्रोत्साहन देण्यासाठी २९ मे ते ८ जून दरम्यान बुध्दिबळसह क्रिकेट, कबड्डी, कॅरम, सूर्यनमस्कार, बैठका आदी स्पर्धांचे आयोजन अमृत महोत्सवी पदार्पणातील वाढदिवसानिमित्त होणार आहे. अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित खेळाडूंसह नामवंत उदयोन्मुख सबज्युनियर बुध्दिबळपटू सहभागी होत असल्यामुळे विजेतेपदासाठी चुरशीच्या साखळी लढती होतील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उद्योजक उदय पवार, मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धा आज रंगणार यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींची एकूण आठ वयोगटाची बुध्दिबळ स्पर्धा १ जून रोजी आरएमएमएस हॉल, परेल, मुंबई-१२ येथे १२१ खेळाडूंमध्ये रंगणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार आहे. विजेत्या-उपविजेत्यांना गोविंदराव मोहिते मित्र मंडळ-उदय पवार, मंगेश चिंदरकर, राजन राणे, अजित आचरेकर आदींतर्फे एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत. गेली पाच दशके क्रीडा व कामगार क्षेत्रात कार्यरत असलेले राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी उमेदीच्या काळात कबड्डी व व्यायाम प्रकारात उल्लेखनीय खेळ केला होता. क्रीडापटूना प्रोत्साहन देण्यासाठी २९ मे ते ८ जून दरम्यान बुध्दिबळसह क्रिकेट, कबड्डी, कॅरम, सूर्यनमस्कार, बैठका आदी स्पर्धांचे आयोजन अमृत महोत्सवी पदार्पणातील वाढदिवसानिमित्त होणार आहे. अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धेत मुंबई शहर व उपनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित खेळाडूंसह नामवंत उदयोन्मुख सबज्युनियर बुध्दिबळपटू सहभागी होत असल्यामुळे विजेतेपदासाठी चुरशीच्या साखळी लढती होतील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उद्योजक उदय पवार, मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.