Mumbai : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त २९ मेपासून आंतर हॉस्पिटल ‘ए’ डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धा शिवाजी पार्क मैदानात रंगणार आहे. रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे नानावटी हॉस्पिटल विरुध्द लीलावती हॉस्पिटल यामध्ये बुधवारी सकाळी ९.०० वा माहीम ज्युवेनील खेळपट्टीवर प्रारंभिक लढत गौरवमूर्ती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लिलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. स्पर्धेप्रसंगी सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. मनोज यादव आणि नानावटी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू प्रतिक पाताडे यांचा विशेष गौरव होणार आहे.
अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेच्या ‘ए’ डिव्हिजनचे विजेतेपद पटकाविण्यासाठी अष्टपैलू प्रतिक पाताडे, ओमकार जाधव, दिनेश पवार, प्रणव हरियान, डॉ. नवनीत राय, नितीन रांजे, किशोर कुयेस्कर आदींचा नानावटी हॉस्पिटल; अष्टपैलू रुपेश कोंडाळकर, मनोहर पाटेकर, धर्मेश स्वामी, सिध्देश घरत, संदेश पंधेरे, विजय नाडकर, विरेश दांडेकर, योगेश जांभळे आदींचा लीलावती हॉस्पिटल; नरेश शिवतरकर, सुभाष शिवगण, जगदीश वाघेला, रोहन म्हापणकर, मनोज जाधव, राकेश शेलार, विलास जाधव आदींचा जे.जे. हॉस्पिटल; अष्टपैलू अॅलन गावद्या, आनंद सुर्वे, देवेंद्र भानसे, अल्केत तांडेल, दीपक सिंघ, सुरज जयस्वाल, ओमकार पाटील, संकेत किणी आदींचा कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी यामध्ये चुरस असेल. ‘बी’ डिव्हिजनच्या अजिंक्यपदासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई, कस्तुरबा हॉस्पिटल यामध्ये अटीतटी असेल.
********”**””””****