मुंबई, 4 ऑगस्ट 2022: ब्लू डार्ट हा भारताचा अग्रगण्य एक्सप्रेस लॉजिस्टीक्स सेवा पुरवठादार असून डीपीडीएचएल ग्रुपचा भाग आहे. त्यांच्या वतीने यंदा सणासुदीच्या निमित्ताने बहीण-भावाचे नाते साजरे करण्यासाठी वार्षिक ‘राखी एक्सप्रेस’ ऑफर बाजारात दाखल केली. या ऑफरचा लाभ घेत, ग्राहकांनी त्यांच्या जीवलगांना 0.5 किलो वजनाची भेट आणि राख्या देशभर कुठेही पाठवल्यास त्यांना रुपये 250 ची सूट मिळेल. त्याशिवाय, ग्राहकांना 0.5 किलोपासून 2.5 किलो, 5 किलो, 10 किलो, 15 किलो, आणि 20 किलो वजनाचा माल परदेशात पाठवताना वाहतूक खर्चावर 50% ची सवलत मिळणार आहे. ही ऑफर 13 ऑगस्ट 2022 पर्यंत वैध राहील.
सणाच्या धामधुमीत भर म्हणून ग्राहकांना स्थानिक पत्त्यांवर राख्या पाठवताना ‘स्लोगन कॉन्टेस्ट’मध्ये सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ग्राहकांना अर्ज पूर्ण भरावा लागेल आणि सोपे घोषवाक्य: “आमच्या कुटुंबाचे ब्लू डार्ट राखी एक्सप्रेसवर प्रेम आहे कारण..” पूर्ण करावे लागेल. आमच्याकडे आलेल्या सर्व प्रवेशातून 10 सर्वोत्तम प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांना ब्लू डार्टकडून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल.
ब्ल्यू डार्टचे चीफ कमर्शियल ऑफिसर केतन कुलकर्णी म्हणाले, “आमच्या प्रत्येक शिपमेंटची किंमत आणि महत्त्व आम्ही जाणतो. जरी पाठवलेला माल राखीइतका लहान असला तरीही तिचे भावनिक मूल्य अधिक आहे. अशाप्रकारच्या खासप्रसंगी ग्राहक वर्गाचा ब्रँडशी निगडीत भर हा रिलायबिलिटी, रिजिलीअन्स आणि रिस्पॉन्सिवनेसवर असतो.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “भारत देश म्हणजे सणांची भूमी आहे आणि सण साजरे करताना भेटवस्तू देण्याला उधाण आलेले असते. दरवर्षी रक्षा बंधनासारख्या विशेष प्रसंगी आम्हाला सणासुदीच्या धामधुमीत सहभागी होताना आनंद वाटतो कारण त्या निमित्ताने आकर्षक ऑफर आणि सवलतींची घोषणा करता येते. आम्हाला आशा वाटते की या ऑफर आमच्या ग्राहकांना शिपिंग खर्चाची चिंता न करता भेटवस्तू पाठवण्याचा आनंद दृढ करेल.”
डीपीडीएचएल ग्रुपचा भाग असलेला ब्लू डार्ट भारताच्या 55,300 पेक्षा अधिक ठिकाणी आणि जगभरात 220 देश-प्रदेशात राखींची डिलिव्हरी करणार आहे. ग्राहकांना हा राखी एक्सप्रेस ऑफरचा लाभ संपर्करहित डिलिव्हरी अनुभवासोबतच 16 डिजीटल वॉलेटस्, नेट बँकिंग, क्रेडीट आणि डेबिट कार्ड, भारत क्यूआर कोड आणि युपीआय (भीम) अशा अनेक पेमेंट पर्यायांसह घेता येईल.
नजीकचा ब्लू डार्ट काउंटर शोधण्यासाठी www.bluedart.com वर लॉग ऑन करा किंवा अॅपल स्टोअर आणि प्ले स्टोअरवरील मोबाईल अॅप्लीकेशनचा वापर करा. ब्लू डार्ट सेवा किंवा अन्य चौकशीसाठी ग्राहक कस्टमर केअर क्रमांक 1860 233 1234 वर संपर्क साधू शकतील किंवा customerservice@bluedart.com वर मेलही करता येईल.