मुंबई/NHI –
सर जेजे हॉस्पिटल क्रिकेट संघाची प्रतिष्ठा गेली चार दशके क्रिकेट क्षेत्रात गौरवशाली करणाऱ्या आजी-माजी क्रिकेटपटूंचा सन्मान सर जेजे हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या शुभ हस्ते २७ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० वा. सर जेजे हॉस्पिटल परिसरात होणार आहे. यावेळी प्रशासकीय अधिकारी संतोष गोसावी व तुषार पावस्कर, कार्यालयीन अधीक्षक दिपक लाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धांमधील प्रतिष्ठेच्या गिरनार तसेच आयडियल आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेत जेजे हॉस्पिटल संघाने गौरवास्पद कामगिरी केली आहे.
सर जेजे हॉस्पिटल क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रवींद्र मोरये, प्रभाकर सुर्वे, प्रमोद पाताडे, चंद्रकांत नाईक, भरत पेडणेकर, मनोज जाधव, नरेश शिवतरकर, विलास जाधव, रमण तांबोळी, विजय मोरे, संतोष तांबोळकर, दाजी रेगे, चंद्रकांत पाटणे, संदेश शेलार, राजा शिवतरकर, जॉन्सन फर्नांडीस, जॉन मस्कारेन्हास, प्रदिप मसुरकर, संतोष म्हागावकर, संतोष कदम, राजू पवार, रुपेश चव्हाण, जॉन फर्नांडीस, निलेश परकर, सुरेश वाघेला, महेंद्र पाटणे, उल्हास चेंदवणकर, सदा सुर्वे, उदय हळदणकर, रवि सुपत, नितीन जाधव, विद्या घाडी, अनिल शेलार, संजय पाटील, अनिल सोळंकी, विनोद पाताडे, भूपेद्र सोलंकी, इकबाल सय्यद, टाभजी बारीया, विजय वाघेला, भूपेंद्र सोलंकी, खिमजी सोलंकी आदी क्रिकेटपटूंचा सन्मान होणार आहे. लेदर बॉल क्रिकेट बरोबरच सर जेजे हॉस्पिटल क्रिकेट संघामधील बहुतांश खेळाडूंनी टेनिस बॉल क्रिकेट विश्व देखील गाजविलेले आहे.
***********************************************************