ऑगस्ट 2022— आपल्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त, यात्रा ऑनलाईन इन्कॉर्पोरेटेड (NASDAQ: YTRA), ह्या भारतातील आघाडीच्या कॉरपोरेट प्रवासी सेवा प्रदाता कंपनी व भारतातील आघाडीच्या ऑनलाईन प्रवास कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने ग्राहकांसाठीच्या सर्व प्रकारांमधील उत्पादनांवर विशेष डील्स आणि ऑफर्सची घोषणा केली आहे. त्यांच्या ह्या उद्योगातील सर्वोत्तम ऑफर्ससाठी कंपनीने विविध बँका व एअरलाईन्ससोबत भागीदारी करून ग्राहकांना वेगवेगळे पर्याय दिले आहेत व त्याद्वारे त्यांना त्यांच्या सहलींच्या नियोजनासाठी ती मदत करत आहे.
Yatra.com च्या प्लॅटफॉर्मवर देशांतर्गत व विदेशातील हॉलिडे, फ्लाईटस, निवासाचे पर्याय, बसेस आणि शहरातील प्रवास व साईटसीईंग पर्याय अशा सर्वांवर सवलतींचा पाऊस पडत आहे. ह्या ऑफर्स 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होतील व त्या 10 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू असतील व त्याद्वारे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता केली जाईल व त्यांना प्रवास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. Yatra.com ची अधिकृत वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि कंपनीचे app अशा सर्व चॅनल्सवर ती लाईव्हही असेल. आयसीआयसीआय, कोटक, एचएसबीसी आणि वनकार्ड ह्या निवडलेल्या पार्टनर बँका आहेत ज्या ह्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी आहेत. तसेच आम्ही एअर इंडिया, एअर एशिया, इंडिगो, विस्तारा, स्पाईसजेट, गो फर्स्ट, एअर सेशेल्स, अमेरिकन एअरलाईन्स, ब्रिटीश एअरवेज, एतिहाद एअरवेज, जपान एअरलाईन्स, मलेशिया एअरलाईन्स, ओमान एअर, स्कूट आणि विर्जिन अटलांटिकसारख्या एअरलाईन्ससोबतही भागीदारी केली आहे.
ह्या ऑफरबद्दल बोलताना, यात्रा ऑनलाईन इन्कचे सह- संस्थापक आणि सीईओ ध्रुव शृंगी ह्यांनी म्हंटले,”Yatra.comचा 16 वा वर्धापनदिन प्रवास व आदर आतिथ्य उद्योगातील आपल्या सर्वांसाठी लक्षणीय व मोठा टप्पा आहे आहे व आज आम्ही भारतातील आघाडीच्या प्रवास कंपन्यांपैकी एक होण्याइतकी मोठी मजल गाठलेली आहे. ह्या प्रसंगी, विविध प्लॅटफॉर्म्सवरील आमच्या ग्राहकांसाठी विशेष डील्स आणि सवलतींची घोषणा करताना आम्हांला विशेष आनंद होत आहे. आम्ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमाने, हॉटेल्स, सुट्ट्यांचे पॅकेज, बसेस आणि ग्राहकांच्या एक्टिव्हिटीज अशा सर्वांसाठी ऑफर्स उपलब्ध केल्या आहेत ज्यामध्ये ग्राहकांना 32% पर्यंत सवलत मिळू शकते. ह्या ऑफर्समुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल व येणा-या मोठ्या वीकएंडसच्या किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये ते त्यांचे मित्र व कुटुंबियांसोबत बाहेर पडतील आणि मजा करतील. ह्या सर्व वर्षांमध्ये आमच्यासोबत राहिल्याबद्दल व Yatra.com प्रवासी भागीदार म्हणून निवडल्याबद्दल आमच्या ग्राहकांना धन्यवाद देण्याची ही आमची पद्धत आहे..”
ऑफर्स घेण्यासाठी, हा प्रोमो कोड वापरावा: Yatra16
ऑफरचे तपशील असे आहेत:
• देशांतर्गत विमाने – फ्लॅट 16% सवलत
• आंतरराष्ट्रीय विमाने – फ्लॅट 12% सवलत
• हॉटेल – फ्लॅट 25% सवलत
• बसेस – फ्लॅट 20% सवलत
• सुट्ट्यांचे पॅकेज – फ्लॅट 10% सवलत
• एक्टिव्हिटीज – फ्लॅट 32% सवलत
Yatra.com ह्या काँट्रॅक्टमध्ये सध्या भारतातील सुमारे 1400 शहरांमधील अंदाजे 93,500 हॉटेल्स आणि होम स्टेज आहेत तसेच जगभरामध्ये 20 लाखांहून अधिक हॉटेल्स आहेत.