मुंबई;- पत्रा चाळ पुर्नविकासाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत शिवसेना नेते संजय राऊत यांना तब्बल १६ तास चौकशी केल्यानंतर रविवार, ३१ जुलै रोजी रात्री १२.४० वाजता अटक केली. त्यांना मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी, १ ऑगस्ट रोजी ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केले, तेव्हा ईडीने संजय राऊत यांना ८ दिवसांची आदींची कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
काय म्हटले ईडीच्या वकिलाने?
पत्रा चाळ प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे मध्यस्थी होते, त्यातून मिळणारा पैसा संजय राऊत यांनी घेतला, पत्रा चाळ पुर्नविकासासाठी म्हाडाने गुरुआशिष कन्स्ट्रक्शनला दिले, मात्र गुरुआशिष कन्स्ट्रक्शनने पुर्नविकास न करता एफएसआस वाधवाण बिल्डरला विकला, त्यातून जो पैसा मिळाला त्यातील ५० कोटी प्रवीण राऊत यांना दिले. तर त्यातील काही रक्कम संजय राऊत यांनाही दिले, असे ईडीच्या वकिलाने म्हटले. त्यांची सविस्तर चौकशी कारण्यासाठी ८ दिवसांची ईडीची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीने केली.
काय म्हटले राऊतांच्या वकिलाने?
त्यानंतर संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊत यांच्याकडे असलेले पैसे हे कायदेशीर पद्धतीने जमलेले आहे. त्यांची अटक ही राजकीयसदृश्य आहे. राजकीय दबावाखाली ईडी काम करत आहे. जेव्हा राज्यात सत्तांतर झाले तेव्हा त्यांना अटक करण्यात आली, प्रवीण राऊत हे व्यापारी आहेत, संजय राऊत यांच्याही काही कंपन्या आहेत, त्या कंपन्यांच्या माध्यमातून पैसा येत असतो, तो ब्लॅकचा पैसा नाही. तसेच राऊत यांची प्रकृती नाजूक आहे, त्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी. तसेच ईडीने यापुढे संजय राऊतांचा तपास राऊतांच्या वकिलाच्या समोर करण्यात यावा, कारण हा तपास राजकीयसदृश्य होऊ शकतो, असेही मुंदरगी म्हणाले.