कंपनीचा देशातील महिलांमधील आर्थिक समावेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानांच्या अवलंबतेमधील लैंगिक तफावत दूर करण्याचा प्रयत्न आहे
हे प्रयत्न नुकतेच महिला सक्षमीकरणावरील जी२० मंत्रीस्तरीय परिषदेमध्ये माननीय पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या सर्वसमावेशकता व सकारात्मक परिवर्तनाला चालना देण्याच्या संदेशाशी संलग्न आहेत.
राष्ट्रीय, : हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी) या भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपनीने घोषणा केली आहे की, कंपनी देशभरातील २५,००० महिलांना आर्थिक व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देणार आहे. कंपनीने या उपक्रमासाठी वाय४डी फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत विविध ठिकाणच्या विविध पार्श्वभूमींमधील महिलांना सक्षम करण्यात येईल आणि आर्थिक व तंत्रज्ञान ज्ञानामधील कौशल्य पोकळी दूर करण्यात येईल.
आर्थिक साक्षरता प्रशिक्षणामध्ये मुलभूत संकल्पनांचे ज्ञान देण्यात येईल, जसे बँकिंग बेसिक्स, खाते उघडण्याची प्रक्रिया, युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) प्रशिक्षण, गुंतवणूकीसंदर्भात मार्गदर्शन, नेट बँकिंग आणि महिलांसाठी विविध सरकारी योजनांबाबत माहिती जसे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘सुकन्या साम रिद्धी योजना नारी शक्ती’. दुसरीकडे डिजिटल साक्षरता घटकामध्ये मोबाइल बँकिंग, डिजिटल मार्केट लिंकेज आणि सायबर सेफ्टी व सिक्युरिटी अशा विषयांचा समावेश असेल, ज्याद्वारे या महिलांना डिजिटल युगामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक टूल्ससह सुसज्ज करण्यात येईल.
प्रशिक्षण देशभरातील निवडक ठिकाणी क्लासरूम-आधारित स्वरूपामध्ये देण्यात येईल. लाभार्थींना निवडण्यात येईल आणि त्यांची रूची, गरजा आणि विद्यमान डिजिटल व आर्थिक साक्षरता स्तरांवर आधारित ग्रुप्समध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. या उपक्रमाचा अधिक केंद्रित व कार्यक्षम अध्ययन अनुभवाला चालना देण्याचा मनसुबा आहे.
या उपक्रमाबाबत हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे चीफ पब्लिक अफेअर्स, कम्युनिकेशन्स अॅण्ड सस्टेनेबिलिटी ऑफिसर हिमांशू प्रियदर्शी म्हणाले, ”एचसीसीबी येथे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी, तसेच आम्ही कार्यरत असलेल्या भागांमधील समुदायांसाठी देखील समान वातावरणाची खात्री घेतो. या महिलांची आर्थिक साक्षरता व डिजिटल क्षमतेमध्ये वाढ करत आम्ही देशाच्या आर्थिक विकासाप्रती योगदान देण्याची आशा व्यक्त करतो. आमचा विश्वास आहे की, वंचित महिलांचे आर्थिक व डिजिटल समावेशन भारताची आर्थिक क्षमता अनलॉक करण्यासाठी आवश्यक आहे. हे प्रयत्न माननीय पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच महिला-केंद्रित विकासासाठी आणि त्यांच्या विविध जी२० भाषणांमध्ये सर्वसमावेशकता व सकारात्मक परिवर्तनाला चालना देण्यामध्ये तंत्रज्ञानाच्या महत्त्वाबाबत केलेल्या आवाहनाशी संलग्न आहेत.”
या प्रकल्पाबाबत अधिक माहिती सांगत हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे चीफ पीपल ऑफिसर गौरव शर्मा म्हणाले, ”एचसीसीबीमध्ये आम्ही करत असलेल्या कार्यामध्ये व्यक्तींना अधिक प्राधान्य देतो, मग ते कर्मचारी असोत किंवा आम्ही कार्यरत असलेल्या भागांमधील समुदाय असो. आमच्यासाठी महिलांचे सक्षमीकरण फक्त एचसीसीबीपुरतेच मर्यादित नसून समाजामध्ये देखील त्याचा प्रचार केला जातो, ज्यामुळे शाश्वत प्रगतीला चालना मिळते. प्रशिक्षण सत्रे या २५,००० महिलांना आवश्यक डिजिटल व आर्थिक कौशल्यांसह सुसज्ज व सक्षम करण्यामध्ये प्रभावी कार्य करतील, तसेच मोठ्या समुदायामध्ये सकारात्मक परिवर्तनाला चालना देतील. आम्हाला अधिक सक्षम, सर्वसमावेशक व शाश्वत समाजाची निर्मिती करण्यामध्ये भूमिका बजावण्याचा आनंद होत आहे.”
या प्रयत्नाच्या माध्यमातून एचसीसीबीचा महिलांना पाठिंबा देण्याची, त्यांना त्यांच्या आर्थिक स्वावलंबतेवर वर्चस्व राखण्यासाठी आणि सरकार व डिजिटल युग प्रदान करणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी सक्षम करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. एचसीसीबीने देशभरातील विविध महिला-केंद्रित बचतगटांना मदत केली आहे, तसेच त्यांना आज त्यांचे उद्योग कार्यान्वित करण्यासाठी सक्षम करत आहे. एचसीसीबीचा या उपक्रमाच्या माध्यमातून अधिक उद्योजक निर्माण करण्याचा मनसुबा आहे.