NHI/Mumbai :
सेंट मेरी हायस्कूल-माझगाव निवड चाचणी बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद १२ वर्षाखालील गटात आरंभ पोकळेने, १४ वर्षाखालील गटात ध्रुव निनावेने तर १६ वर्षाखालील गटात जोईल सिंगने पटकाविले. सेंट मेरी हायस्कूलतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप सहकार्याने झालेल्या बुध्दिबळ स्पर्धेमधील लहान गटात आरंभ पोकळेने (४ गुण) वजीर व हत्तीच्या सहाय्याने आक्रमक डावपेच रचत अर्णव विचारेच्या राजाला जेरीस आणले आणि प्रथम क्रमांकावर झेप घेतली. या गटात अर्णव विचारेने (३ गुण) द्वितीय, अथर्व राठोडने (२ गुण) तृतीय व समर्थने (२ गुण) चौथा क्रमांक मिळविला.
१४ वर्षाखालील गटात ध्रुव निनावेला (४ गुण) प्रथम स्थान पटकाविताना उपविजेत्या मॅथ्यू विल्सनच्या (३ गुण) आक्रमक चालींना निर्णायक फेरीत यशस्वी प्रतिशह ध्यावा लागला. शिवेश सिंगने (२ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. १६ वर्षाखालील गटात जोईल सिंगने (४ गुण) प्रथम, जोआब सिंगने (३ गुण) द्वितीय, अबीअली इब्राहीमने (२ गुण) तृतीय व इशांत मिश्राने (२ गुण) चौथा क्रमांक जिंकला. विजेत्या-उपविजेत्यांचे सेंट मेरी हायस्कूलचे प्रिन्सिपल फादर फेलिक्स डिसोझा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, क्रीडा शिक्षक संदीप यादव, पंच अविनाश महाडिक, प्रॉमिस सैतवडेकर यांनी अभिनंदन केले.
******************************