महागाईने जनता हैरान झाली आहे. इंधन, गॅस दरवाढीमुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. महागाई कमी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. हा मुद्दा आता एका लहान मुलीनेही उचलून धरला आहे.तर दुसरीकडे सरकार दमणकारीवर उतरले आहे. महागाईविरूध्द आंदोलन करणाऱ्यांना प्रतिनिधींना लोकसभेतून निलंबित करणाऱ्या सरकारसाठी आता तरी महागाई हा जिव्हाळ्याचा प्रश्न वाटेल का?, असा प्रश्न सर्वसामान्य आम नागरिक विचारत आहे.
कन्नौज (यू.पी) – महागाईने जनता हैरान झाली आहे. इंधन, गॅस दरवाढीमुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. महागाई कमी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. हा मुद्दा आता एका लहान मुलीनेही उचलून धरला आहे. पहिलीत शिकणाऱ्या 6 वर्षीय मुलीने पेन्सिल, मॅगी दैनदिन उपयोगी वस्तू महाग झाल्याचे पंतप्रधान मोदी यांना लक्षात आणून दिले. क्रिती दुबे असे या चिमुकलीचे नाव आहे.
माझी पेन्सिल आणि रबर देखील महाग झाले – पहिलीत शिकणाऱ्या क्रितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात, मोदीजी तुम्ही महागाई वाढवली आहे. माझी पेन्सिल आणि रबर देखील महाग झाले आहे. मॅगीची किंमत देखील वाढली आहे, अशी चिंता क्रिती हिने पंतप्रधानांना पत्रातून व्यक्त केली. आता पेन्सिल मागितल्यास माझी आई मला मारते. मी काय करू? दुसरी मुले माझी पेन्सिल चोरतात, अशी खंत क्रितीने पंतप्रधानांपुढे व्यक्त केली आहे. क्रितीने हिंदीत पत्र लिहिले असून ते समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. हे माझ्या मुलीची ‘मन की बात’ असल्याचे क्रितीचे वडील अॅड. विशाल दुबे यांनी सांगितले. नुकतीच शाळेत तिची पेन्सिल हरवल्यावर तिच्या आईने तिची खरडपट्टी काढली तेव्हा ती नाराज झाली होती.
चिमुरडीच्या पत्राबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपल्याला कळले असल्याचे छिब्रामाऊचे एसडीएम अशोक कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. मी त्या मुलीला कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार आहे आणि तिचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे एसडीएम यांनी सांगितले