मुंबई, ३१ जुलै २०२२: भारतात पेपरफ्रायचे सर्वात मोठे वेअरहाऊस पडघा फुलफिलमेंट सेंटर हे तब्बल २८५००० चौरस फूट जागेवर उभारण्यात आले असून त्यामध्ये जवळपास ५२ फीट उंच सात मजले फर्निचरने भरलेले आहेत. हे फुलफिलमेंट सेंटर भारताच्या पश्चिम भागात पेपरफ्रायच्या संचालनाचे केंद्रस्थान म्हणून काम करते.
पडघा वेयरहाऊस स्टोरेज आणि लॉजिस्टिक्सशी संबंधित अत्याधुनिक पायाभूत सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये स्वयंचलित इन्व्हेंटरी मॅनेजमेंट यंत्रणा आहे जी पेपरफ्रायला मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील सातत्याने वाढत असलेल्या ग्राहक संख्येला अधिकाधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी सक्षम बनवते. महत्त्वाचे महामार्ग आणि दळणवळण केंद्रांच्या जवळ असल्याने इथून ग्राहकांना त्यांच्या ऑर्डर्स पोचत्या करणे अगदी सोयीचे आहे. पेपरफ्रायवरील जवळपास ६०% ऑर्डर्स पडघा वेयरहाऊसमधून पूर्ण केल्या जातात, म्हणजे दिवसाला सर्वसाधारणपणे २,००० बॉक्सेस इथून पोहोचते केले जातात.
जुलै २०२१ ते जून २०२२ या कालावधीत पेपरफ्रायच्या एकंदरीत पुरवठा शृंखला व्यवसायाने अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. २४ तासांत तब्बल ९.८ लाख शिपमेंट्स ग्राहकांना पोचत्या करण्यात आल्या आणि प्रवासादरम्यान मालाचे नुकसान होण्याचे प्रमाण फक्त २% पेक्षा देखील कमी होते. ग्राहकांना त्यांच्या ऑर्डर्स लवकरात लवकर मिळाव्यात यावर पेपरफ्रायने आपले लक्ष केंद्रित केले आहे. ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये पेपरफ्रायने गेल्या सहा महिन्यांमध्ये ३७% ची घट करण्यात यश मिळवले आहे.
पेपरफ्रायने बिग-बॉक्स पुरवठा शृंखला उभारली असून त्यामध्ये देशभरातील ५०० पेक्षा जास्त शहरांमधील खरेदीदार व विक्रेते यांना एकत्र जोडण्याची त्यांची योजना आहे. या प्लॅटफॉर्मवर पेपरफ्रायकडे १७,००० जास्त उत्पादने असून तब्बल १०,००० पिनकोड्सना सेवा पुरवल्या जातात. ३० पेक्षा जास्त वितरण केंद्रे आणि ग्राहकांना वस्तू घरपोच पोचवणाऱ्या ४०० पेक्षा जास्त ट्रक्सच्या साहाय्याने आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त आनंद आणि समाधान मिळवून देण्यासाठी पेपरफ्राय सातत्याने प्रयत्नशील आहे. पेपरफ्रायने स्थापन केलेल्या हब अँड स्पोक व्यवसाय मॉडेलमुळे तृतीय पक्षीय लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादारांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करण्यात व प्रत्येक ऑर्डरसाठी येणाऱ्या खर्चात घट करण्यात मदत झाली आहे.