नोयडा : तुम्ही नियमित शहाळ्यातलं पाणी पित असाल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जीवाला शांत करण्याकरता तुम्ही थंडगार शहाळं रस्त्याच्या कडेला असलेल्या शहाळे विक्रेत्याकडून घेत असाल तर तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळता आहात. कारण, फळं टवटवीत दिसण्याकरता त्यावर पाणी शिंपडलं जातं. पण ते पाणी जर गटारातील असेल तर? तुम्हाला खोटं वाटेल पण खाली दिलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. हा धक्कादायक प्रकार घडला आहे नोएडा शहरात.
नोएडामधील एका नारळ विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील दृश्यानुसार, रस्त्याच्या कडेला एका नारळ पाणी विक्रेत्याचा स्टॉल आहे. नारळ विक्रेता बाजूला असलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारातून सांडपाणी एका भांड्यात घेतो आणि नारळांवर शिंपडतो.
रविवारी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही तत्काळ दखल घेत यावर कारवाई केली. बिसारख पोलीस ठाण्याचे अनिल कुमार राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नारळ विक्रेत्याला अटक केली असून त्याचं नाव समीर (२८) आहे. तो उत्तर प्रदेशातील बरेली येथील नागरिक आहे.
हा व्हिडीओ अनेकांच्या सोशल मीडिया पेजवरून व्हायरल झाला आहे. त्यामुळे तो पोलिसांपर्यंतही पोहोचला. पोलिसांनीही तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या विक्रेत्याला पोलिसांनी त्याला सज्जड दम भरला आहे.
Shudh Taaza Nariyal Pani 🤲
Refreshing and Hygienic Coconut Water sprinkled with 'Aab-e-Zim Zim' and Sold in Shree Radha Krishna Sky Garden Society in Greater Noida. pic.twitter.com/PumE5uMBNE
— Surender Singh Rana (@Surende05060255) June 6, 2023