जालना : सुरक्षित राहण्यासाठी शिंदे यांना पाठिंबा असा जाहिर कबुलीनामा दिलेला अर्जुन खोतकर यांचा कबुली नामा भाजपने मोन धारण करून स्विकारला.अशाप्रकारे राजकारणात केंद्र तथा राज्यातील नितीमत्ता किती खालावून टाकली आहे याचे हे जिवंत उदाहरण आहे.
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. हा निर्णय जाहीर करतेवेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून ‘परिस्थतीनुरूप निर्णय घेत आहे’ असे सांगितल्याचेही खोतकर यांनी या वेळी सांगितले. सुरक्षित राहण्यासाठीच शिंदेंना पाठिंबा दिल्याची कबुली खोतकर यांनी दिली.
जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी संदर्भात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या चौकशीचा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन खोतकर म्हणाले, की निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून तापडिया यांनी ४२ कोटी रुपयांस हा कारखाना विकत घेतला. परंतु त्यांना मुदतीत पैसे भरता आले नाहीत. हा कारखाना पुढे अजित सीडस् यांनी ४४ कोटी रुपयांस विकत घेतला. हा कारखाना सुरू राहावा यासाठी आपण आणि आपल्या परिवाराने त्यात सात कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यापैकी पाच कोटी रुपये देवगिरी बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात घेतले आणि ते अद्यापही देणे आहेत. २०१४ मध्ये हा कारखाना अजित सीडसने ताब्यात घेतला. कर्मचारी न्यायालयात गेले, दुष्काळी परिस्थती निर्माण झाली, करोनाचा प्रादुर्भाव झाला. या पार्श्वभूमीवर कारखाना सुरू होण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली.
‘तुमची अडचण असेल तर जा’ : उद्धव ठाकरे- ईती खोतकर
अडचणीतील माणूस सहारा शोधतो, असे सांगून खोतकर म्हणाले, की या संदर्भात आपण उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांना सांगितले, की मी ‘परिस्थतीनुरूप निर्णय घेत आहे’. त्यावर ते म्हणाले, की ‘तुमची अडचण असेल तर तुम्ही जा’.