मुंबई : लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २ जूनपासून शिवाजी पार्क मैदानात होत आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे होणाऱ्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध जे.जे. हॉस्पिटल यामध्ये शुक्रवारी सकाळी ९.३० वा. मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु होईल.
आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा ७ जूनपर्यंत रंगणार आहे. रुग्णालयीन क्रिकेट संघांना मागील दशकापासून प्रोत्साहन देणारी आयडियल ग्रुपची परंपरा कायम राहण्यासाठी मुंबईचे माजी शेरीफ डॉ. जगन्नाथराव हेगडे देखील प्रयत्नशील आहेत. याप्रसंगी रुग्णालयीन अष्टपैलू क्रिकेटपटू सेव्हन हिल्स हॉस्पिटल क्रिकेट संघाचे डॉ. इब्राहीम शेख व बॉम्बे हॉस्पिटल क्रिकेट संघाचे संतोष रांगवकर यांचा विशेष गौरव होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लायन डॉ. जगन्नाथराव हेगडे व संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर, मंदार भानप, ओमकार चव्हाण आदी विशेष कार्यरत आहेत.
******************************