MUMBAI/NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे आरएमएमएस सहकार्याने क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवी आरएमएमएस चषक ७/१०/१३ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत दर्श राऊत, गिरीशा पै, मित्रा सात्विक, सैशा मूळे, शर्विन बडवे, मायशा परवेझ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. ७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये अपराजित दर्श राऊतने एकूण साखळी ५ फेऱ्यांमध्ये सर्वाधिक ५ गुण घेत गटविजेतेपदाला गवसणी घातली. विठ्ठल नारायणनने (४ गुण) द्वितीय, लोबो देत्यानने (४ गुण) तृतीय, पार्थ गणपुलेने (४ गुण) चौथा व परीश्रुत काळेने (४ गुण) पाचवा क्रमांक पटकाविला. याच वयोगटात मुलींमध्ये गिरीशा पैने (३.५ गुण) प्रथम, अनिष्का बियाणीने (३ गुण) द्वितीय व काव्या मेहताने (२ गुण) तृतीय पुरस्कार मिळविला.
मुंबई बुध्दिबळ संघटना मान्यतेने परेल येथे झालेल्या १० वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये मित्रा सात्विकने (४.५ गुण) प्रथम, हितांश साबूने (४.५ गुण) द्वितीय, शिवांक झाने (४ गुण) तृतीय, दर्श कुमारने (४ गुण) चौथा, अझीम हकीमने (३.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये सैषा मुळेने (३ गुण) प्रथम, वर्री गोगरीने (२.५ गुण) द्वितीय, आराध्या पुरोने (२ गुण) तृतीय क्रमांक जिंकला. १३ वर्षाखालील वयोगटात शर्विन बडवेने (४.५ गुण) प्रथम, व्योम शिवमाथने (४ गुण) द्वितीय, लोबो फेरडीनने (४ गुण) तृतीय, मानस हाथीने (४ गुण) चौथा, हृदय मणियारने (३.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये मायशा परवेझने (३.५ गुण) प्रथम, मयंका राणाने (३.५ गुण) द्वितीय व सारा नाईकने (३ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, सिंधुदुर्ग बँकेचे चेअरमन हरीश परब, चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना गौरविण्यात आले.