• आयआयटी, मुंबई पेटंटप्राप्त “शेप डीएक्स”-सुसज्ज सिकल सेल चाचणी उपकरणांचे अनन्य उत्पादन आणि वितरण भागीदारी
• सिकलसेल चाचणी पॉस (पॉइंट ऑफ स्क्रीनिंग) उपकरणे सरकारी आरोग्य केंद्रे, प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि सामाजिक संस्थांसोबत सहकार्य
• सिकलसेल चाचणी आणि इतर आरोग्य सेवांसाठी भारतभर ५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह १,००० पॅथॉलॉजी लॅब सुरू करणे. लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज विविध प्रकारच्या रुग्णांसाठी अनुकूल आयव्हीडी, रक्तविज्ञान आणि सेरोलॉजी उत्पादने विकसित करत आहे जे अगदी १०० टक्क्यांपर्यंत अत्यंत अचूक परिणाम देतील.
• लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज, त्याची उपकंपनी लॉर्ड्स मार्क बायोटेकद्वारे देशभरातील स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीतज्ञांमध्ये गर्भधारणेपूर्वी आणि नंतरची लक्षणे लवकर तपासण्यासाठी या चाचणीची पडताळणी करून घेईल. लॉर्ड्स मार्क बायोटेकने आधीच २०० विक्री व्यावसायिकांच्या समर्पित संघाद्वारे महिलांच्या वेलनेस थेरपी क्षेत्रात या चाचणी आणि पडताळणीला गती दिली आहे.
• लॉर्ड्स मार्क बायोटेक आगामी काळात सांध्यांची निगा, किडनी निगा, जुनाट त्वचा विकार आणि बर्याच गोष्टींवर उपचार करण्यासाठी कठीण परिस्थितीत पेटंट उत्पादने आणण्यासाठी जागतिक संशोधन कंपन्यांशी युती करत आहे. लॉर्ड्स मार्क बायोटेक वृध्द लोकसंख्येमध्ये निरोगी राहण्यासाठी महिलांच्या आरोग्य आणि जीवनशैली विभागामध्ये भरपूर उत्पादने प्रस्तुत करत आहे ज्याचा भारतीय लोकसंख्येच्या मोठ्या भागावर सकारात्मक परिणाम होईल.
मुंबई, २५ मे २०२३: लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज या एक प्रमुख वैविध्यपूर्ण व्यवसाय समूहाने भारतातील सिकलसेल चाचणीत क्रांती घडवून आणण्यासाठी प्रख्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी-बी) सोबत भागीदारी केली आहे. आयआयटी मुंबईद्वारे पेटंटप्राप्त देशातील पहिले एआय-सक्षम पॉस उपकरणे, सिकलसेल चाचणीशी संबंधित आव्हानांना सामोरे जातील, १०० टक्के अचूकतेसह ते या उपकरणांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवतील. मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा गुरुवारी करण्यात आली. लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज २०२६-२७ पर्यंत १०० कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवून तंत्रज्ञान-सक्षम पॉस उपकरणे विकसित आणि वितरित करण्यासाठी २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज वसईतील त्यांच्या आयव्हीडी उत्पादन सुविधेमध्ये सिकलसेल पॉस उपकरणे तयार करण्यासाठी त्यांच्या इन-हाउस संशोधन व विकास संघाचा वापर करेल. ही उपकरणे देशभरातील सरकारी आरोग्य केंद्रे, पॅथॉलॉजी लॅब आणि लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये उपलब्ध असतील.
या सहकार्यावर भाष्य करताना, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजचे संस्थापक श्री सच्चिदानंद उपाध्याय म्हणाले, “आयआयटी-मुंबई सोबतच्या या सहकार्याद्वारे, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज संपूर्ण भारतामध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, सिकलसेल चाचणीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपाय प्रदान करण्यासाठी वचनबद्धतेला पुढे नेत आहे. आम्ही सिकलसेल चाचणी आणि इतर आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह देशभरात १,००० पॅथॉलॉजी लॅबच्या स्थापनेतही गुंतवणूक करत आहेत. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने ही उपकरणे बनवण्याचे व चाचणी सरकारी आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.”
आयआयटी-मुंबईमधील बायोसायन्सेस आणि बायोइंजिनियरिंग विभागातील प्रख्यात प्रा. देबजानी पॉल आणि त्यांच्या संघाने विकसित केलेली मायक्रोस्कोपी-आधारित चाचणी ही निगेच्या ठिकाणी रक्त नमुन्यांचे निरोगी, सिकल ट्रेट आणि सिकल अॅनिमिया अशी फारकत करू शकते. आयआयटी-मुंबई आणि लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज यांच्यातील सहकार्याचे उद्दिष्ट भारतातील सिकलसेल चाचणीत क्रांती घडवून आणणे आणि जेणेकरून उपचार खर्च कमी केला जाईल आणि बाधित लोकसंख्येसाठी सुविधा सक्षम केल्या जातील, यासाठी प्राथमिक उपचाराच्या ठिकाणी देशभरातील रूग्णांसाठी सुधारित रोग निदान आणि व्यवस्थापन सुविधा प्रदान करणे, असे आहे. ही एकमेव मायक्रोस्कोपी चाचणी आहे जी ३० मिनिटांच्या आत सिकल अॅनिमिया असलेल्या व्यक्तीपासून वाहक वेगळे करू शकते. सामान्यतः वाहक ओळखण्यासाठी २४ ते ४८ तास लागत असतात.
“आमचे परवानाकृत एआय-सक्षम सिकलसेल चाचणी तंत्रज्ञान भारतभरात सर्वत्र सादर करण्यासाठी लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीजशी सहयोग करण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रभावित क्षेत्रांमध्ये सिकलसेल पडताळणीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आमचे तंत्रज्ञान एक गेम चेंजर ठरणार आहे. आमचा विश्वास आहे की आमचे तंत्रज्ञान लॉर्ड्स मार्कसह एकत्रित झाले आहे. देशातील सिकलसेल अॅनिमियाने ग्रस्त लाखो रुग्णांच्या जीवनात सुधारणा करण्यावर उद्योगांच्या क्षमतांचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडेल,” असे आयआयटी मुंबईचे संशोधक डॉ. ओशिन शर्मा म्हणाले.
भारत सरकारने गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा यांसारख्या मध्य आणि दक्षिणी प्रदेशांमध्ये सिकल सेल अॅनिमिया शोधणे आणि उपचार सुधारण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपायांमध्ये नवजात मुलांची तपासणी, राष्ट्रीय निर्मूलन मोहीम, क्लिनिकल चाचण्या आणि विवाहपूर्व समुपदेशन यांचा समावेश आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयाने या संबंधाने स्पष्ट दिशानिर्देश दिले आहेत आणि पडताळणीसह रोगाचा सामना करण्यासाठी अनुदान मागणाऱ्या राज्यांना ६० कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.
या प्रयत्नांच्या अनुषंगाने, लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज आणि आयआयटी मुंबई यांच्यातील भागीदारी हे भारतातील सिकलसेल रोगाशी लढण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सहयोगाचे उद्दिष्ट रुग्णांसाठी तपासणी आणि निदान प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवून, एकंदर प्रक्रिया सुधारणे हा आहे. परिणामी लवकर हस्तक्षेपास आणि उपचारास चालना दिली जाईल आणि रोगाचे व्यवस्थापन सुधारेल, त्याचप्रमाणे भारत सरकारच्या या रोगाचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांना हातभार लावला जाईल.