गेल्या दोन वर्षांमध्ये प्रभावी निकाल संपादित; पुढील दोन वर्षांसाठी मोठ्या कटिबद्धतांची योजना
मुंबई, १७ मे २०२३: बायजू’ज एज्युकेशन फॉर ऑल हा बायजू’जचा ना-नफा तत्त्वावर आधारित उपक्रम आहे. या उपक्रमाचा २०२५ पर्यंत भारतातील १० दशलक्ष वंचित मुलांना दर्जेदार शिक्षणासह सक्षम करण्याचा मनसुबा आहे. या उपक्रमाने हे ध्येय संपादित करण्यासाठी १७५ हून अधिक एनजीओंसोबत सहयोग केला आहे आणि नुकतेत मुंबईमध्ये प्रमुख एनजीओ सहयोगींसोबत आयोजित करण्यात आलेली बैठक हा दृष्टिकोन पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल होते.
बैठकीदरम्यान बायजू’जच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील एनजीओंसोबतच्या उपक्रमाच्या भागीदारीच्या परिणामाबाबत चर्चा केली. गोलमेज परिषदेत विद्यमान शैक्षणिक स्थिती आणि लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी शक्यतांबाबत देखील चर्चा करण्यात आली, तसेच पुढील शैक्षणिक वर्षामध्ये अतिरिक्त १० लाख विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे संयुक्तपणे वचन घेण्यात आले.
बायजू’ज एज्युकेशन फॉर ऑल आणि विविध एनजीओ सहयोगी यांच्यामधील सहयोगाने महाराष्ट्रातील ४.६५ लाखांहून अधिक मुलांच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे. गोलमेज बैठकीने उपक्रमाच्या त्यांच्या सहयोगींसोबतच्या सहयोगांची काही ठळक वैशिष्ट्ये देखील दाखवली.
उदाहरणार्थ, लाडली फाऊंडेशनने मोफत बायजू’ज कोर्सेस इन्सेन्टिव्ह म्हणून वापरल्यानंतर लसीकरण मोहिमांमध्ये उपस्थित राहणाऱ्या ग्रामीण रहिवाशांच्या आकडेवारीत स्थिर वाढ पाहिली आहे. फाऊंडेशनने राजस्थानमध्ये दोन भव्य मोहिमा देखील लाँच केल्या, ‘डॉमेस्टिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’, जेथे बायजू’ज टॅब्स स्थानिक मदतनीस/जवळच्या गरजूंच्या मुलांना दान करण्यात आले आणि ‘एक लाडली मेरी भी’, जी मुलींच्या शिक्षणाला चालना देते.
तसेच, खाना चाहिए सहयोगी आदर्श फाऊंडेशनला २०१४ मध्ये ९५ टक्के विद्यार्थी गळती पाहायला मिळाली, पण विविध उपक्रम, तसेच बायजू’ज कन्टेन्टच्या सादरीकरणामुळे २०२२ मध्ये फक्त ५ टक्क्यांपर्यंत विद्यार्थी गळती पाहायला मिळाली. या उपक्रमांनी, तसेच बायजू’ज कन्टेन्टने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाप्रती रूची निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच अनाथाश्रम, बालगृह, ट्रान्सजेंडर, लैंगिक कामगार, नगरपालिका स्वच्छता कर्मचारी, आदिवासी ग्रामस्थ, स्थलांतरित कामगार, वाहन टोइंग कर्मचारी आणि मुंबईतील डब्बावाल्यांसह समाजातील वंचित घटकांमधील दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना स्माइल फाऊंडेशनच्या माध्यमातून बायजू’ज मोफत शैक्षणिक कन्टेन्टचा फायदा झाला आहे.
दिव्या गोकुलनाथ यांनी भारतातील वंचित मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याप्रती उपक्रमाची कटिबद्धता आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एनजीओंसोबतच्या सहयोगाचे महत्त्व याबाबत आश्वासन दिले. गोलमेज बैठक हे गरजू मुलांचे सक्षमीकरण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल होते आणि सहयोगाने ते भारतातील वंचित मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवू शकतात.
दिव्या आतापर्यंत मिळालेल्या निकालांबाबत आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्रात बायजू’ज एज्युकेशन फॉर ऑल मध्ये आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवण्यासोबत पुढील शैक्षणिक वर्षात अतिरिक्त १० लाख विद्यार्थ्यांना मोफतपणे बायजू’ज कन्टेन्ट उपलब्ध करून देत आमच्या प्रवासामध्ये पुढील पाऊल उचलण्यास उत्सुक आहोत. भारतभरातील एनजीओंसोबतच्या आमच्या सहयोगाने महाराष्ट्रातील ४.६५ लाखांहून अधिक मुलांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे आणि आम्ही उच्च दर्जाच्या शिक्षणासह अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोण्याप्रती कटिबद्ध आहोत. आमच्या एनजीओ सहयोगींसोबत सहयोगाने आम्ही गरजू मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो आणि दर्जेदार शिक्षण असलेल्या व नसलेल्या विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक पोकळी दूर करू शकतो. आम्ही आतापर्यंत संपादित केलेल्या निकालांचा मला अभिमान आहे आणि मी भविष्यात आम्ही निर्माण करू शकणारे परिणाम पाहण्यास उत्सुक आहे.’’