पुणे,: इटालियन पिअॅजिओ ग्रुपची १०० टक्के मालकी असलेली उपकंपनी तसेच प्रतिष्ठेची वेस्पा व दणकट अप्रिलिया या श्रेणीतील स्कूटर्सचे उत्पादन करणारी कंपनी पिअॅजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडने वेस्पा ड्युअलच्या स्वरूपात आपल्या शैलीदार पोर्टफोलिओमध्ये रोचक भर घातल्याची घोषणा केली आहे. वेगळे उठून दिसण्यासाठी किंवा स्वत:ची भूमिका मांडण्यासाठी इच्छुक असलेल्या जेन-झेडला डोळ्यापुढे ठेवून तयार करण्यात आलेली ही वेस्पा ड्युएल खास दुरंगी आवरणाने (टू-टोन लिव्हरी) तसेच रंगीत फूटबोर्डने नटलेली आहे. तिचे स्वरूप ठळक आणि खेळकर संवेदना निर्माण करणारे आहे. चार अनोख्या आणि अभिजात दुरंगी रंगसंगतींचे पर्याय तसेच मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी अधिक आरामदायी व्यवस्था यांमुळे एकरंगी स्कूटर्सच्या तुलनेत ही स्कूटर वेगळी उठून दिसते.
आपली प्रत्येक गोष्ट अनन्यसाधारण असावी ही जनरेशन झेडची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेली व्हेस्पा ड्युअल, तिच्या दुहेरी रंगामुळे वेस्पाच्या रंगीत विश्वातही वेगळी उठून दिसते. पिअॅजिओच्या अत्याधुनिक व प्रगत आय-गेट इंजिनने सुसज्ज असलेली वेस्पा ड्युएल ही ओबीडी-टूची पूर्तता करणारी आहे आणि ती १२५ सीसी व १५० सीसी अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. नवीन वेस्पा ड्युअलमध्ये आरामदायी बॅकरेस्ट, सर्वजण मान वळवून बघतील असे आकर्षक व सौंदर्यपूर्ण स्टिकर्स आणि शैलीदार व स्पष्ट सॅड्ल हे सगळे आहे.
इटलीत डिझाइन केलेली आकर्षक वेस्पा ड्युअल ही स्वप्नाळू लोकांसाठी आहे: तरुण, ठसठशीत आणि धाडसी. बिनधास्त आणि अनन्यसाधारण व कोणी कधीच जगले नाही अशा पद्धती आयुष्य जगू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही स्कूटर आहे. कॉलेजला जाण्यासाठी, भटकण्यासाठी तसेच पहिल्यावहिल्या मुलाखतीला जाण्यासाठीही वेस्पा उत्तम आहे. सामान्यतेने भरलेल्या विश्वात, वेगळे उठून दिसण्यासाठी व वैशिष्ट्यपूर्ण भासण्यासाठी वेस्पा ड्युअल रायडर्सना मदत करेल.
पिअॅजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्हणाले, “वेस्पा हा इटलीतील जीवनशैलीचा, बेधडक उत्स्फूर्ततेचा आणि जीवन पूर्ण भरात जगण्याच्या वृत्तीचा अर्क आहे. स्वातंत्र्य व अपारंपरिक शैलीचा करिष्मा वाहत आलेल्या संपूर्ण पिढ्यांची मने वेस्पाने अनेक वर्षांपासून जिंकून घेतली आहेत. वेस्पा ड्युअलच्या माध्यमातून आम्हाला आगामी जेन झेडला आकर्षित करून घ्यायचे आहे. ही पिढी नेहमीच वेगळ्या आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दर्शवणाऱ्या गोष्टींच्या शोधात असते. त्यामुळेच आम्हाला अधिक नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आणि वेस्पाच्या विश्वात त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे. वेस्पा प्रत्येक प्रकारच्या ग्राहकासाठी आहे आणि तरुण व धाडसी पद्दतीने जगणाऱ्यांसाठी वेस्पा ड्युअल आहे.
ते पुढे म्हणाले, “लग्झरी स्कूटर्सचा पाया घालणारी स्कूटर म्हणून वेस्पा ड्युअल या विभागात डिझाइन्सचे नवीन मापदंड स्थापित करेल आणि आमच्या रायडर्सना त्यातून निखळ आनंद मिळेल, असा आत्मविश्वास मला वाटतो.”
पिअॅजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडमधील टूव्हीलर देशांतर्गत व्यवसाय विभागाचे (आयसीई) कार्यकारी उपाध्यक्ष श्री. अजय रघुवंशी, वेस्पाच्या नवीन उत्पादनाबद्दल म्हणाले, “तरुण, बिनधास्त व मुक्त जीवनशैली साजरी करणारी वेस्पा ड्युअल म्हणजे तरुणाईच्या चैतन्याला वंदन आहे. वेस्पा ड्युअल तिच्या अपारंपरिक व आकर्षक रंगसंगतीमुळे उठून दिसते आणि ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल हे नक्की. रायडर आणि मागे बसणाऱ्या (पिलियन) प्रवाशाचा आराम वाढवण्यासाठी आम्ही काही घटकांची भरही घातली आहे. प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा पर्याय निवडणाऱ्या, नवीन अनुभवांचा पाठलाग करत अनन्यसाधारण आयुष्य जगणाऱ्या, गर्दीत उठून दिसणाऱ्या, सर्वांना माना वळवून बघण्यास भाग पाडणाऱ्या सर्वांसाठी वेस्पा ड्युएल डिझाइन करण्यात आली आहे. ती कशी स्वीकारली जाते हे बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
हा नवीन दुरंगी प्रकार पुढीलप्रमाणे आकर्षक रंगसंगतींमध्ये उपलब्ध होईल:
वेस्पा ड्युअल (व्हीएक्सएल):
रंग: पर्ल व्हाइट + अझ्युरो प्रोवेंझा किंमत (एक्स-शोरूम, महाराष्ट्र): व्हीएक्सएल १२५: १.३२ लाख रुपयांपासून पुढे व्हीएक्सएल १५०: १.४६ लाख रुपयांपासून पुढे पर्ल व्हाइट + अझ्युरो प्रोवेंझा |
वेस्पा ड्युअल (व्हीएक्सएल):
रंग: पर्ल व्हाइट + बेज किंमत (एक्स-शोरूम, महाराष्ट्र):: व्हीएक्सएल १२५: १.३२ लाख रुपयांपासून पुढे व्हीएक्सएल १५०: १.४६ लाख रुपयांपासून पुढे पर्ल व्हाइट + बेज |
वेस्पा ड्युएल (एसएक्सएल) :
रंग : पर्ल व्हाइट + मॅट रेड किंमत (एक्स- शोरूम महाराष्ट्र): एसएक्सएल १२५: १.३७ लाख रुपयांपासून पुढे एसएक्सएल १५०: १.४९ लाख रुपयांपासून पुढे पर्ल व्हाइट + मॅट रेड
|
वेस्पा ड्युएल (व्हीएक्सएल) :
रंग : पर्ल व्हाइट + मॅट ब्लॅक किंमत (एक्स- शोरूम महाराष्ट्र): एसएक्सएल १२५: १.३७ लाख रुपयांपासून पुढे एसएक्सएल १५०: १.४९ लाख रुपयांपासून पुढे पर्ल व्हाइट + मॅट ब्लॅक |
नवीन वेस्पा ड्युअल १५ मे २०२३ पासून भारतातील सर्व २५० हून अधिक डीलरशिप्समध्ये उपलब्ध होईल.