• 31 मार्च 2023 अखेरीस करोत्तर नफा (पॅट) 1623 कोटी रुपयांवर(एकत्रित), वार्षिक 52 टक्के वाढ
• एकूण कर्जपुस्तकातील रिटेल पोटफोलिओचा हिस्सा आता 75 टक्के
• सर्व प्रकारच्या रिटेल विभागातील मजबूत वाढीमुळे उच्चांकी वार्षिक रिटेल वितरण 42,065 कोटी रुपयांवर
• होलसेल कर्जवितरणात वार्षिक 54 टक्क्यांनी कपात करत ते 19 हजार 840 कोटी रुपयांवर
• प्लॅनेट अॅपने ओलांडला तीस लाख डाउनलोड्सचा टप्पा, फिनटेक अॅट स्केल उद्दीष्ट गाठण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचे मजबूत पाठबळ
मुंबई, : बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांतील (एनबीएफसी) आघाडीची कंपनी असलेल्या एल अँड टी फायनान्स होल्डींग लिमिटेड (एलटीएफएच) ने डिजीटल तंत्रज्ञानावर आधारित उच्च दर्जाची ग्राहकांभिमुख रिटेल एनबीएफसी कंपनी बनण्याच्या दिशेने दमदार प्रवास आणखी वेगाने सुरु केला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने वितरित केलेल्या एकूण कर्जापैकी 75 टक्के कर्ज हे रिटेल पोर्टफोलिओ स्वरुपातील असून लक्ष्य 2026 मध्ये निर्धारित केलेल्या उद्दीष्टाच्या 80 टक्क्यांपैकी अधिक उद्दीष्ट कंपनीने गाठलेले आहे.
वित्तीय वर्ष 2023 मध्ये कंपनीने 42 हजार 65 कोटी रुपयांचे रिटेल कर्ज वितरित केले आहे. गतवर्षाशी तुलना करता त्यात 69 टक्के वाढ कंपनीने साध्य केली आहे. एकूण रिटेल कर्जाचे प्रमाण सध्या 61 हजार 53 कोटी रुपये असून 31 मार्च 2022 च्या तुलनेत त्यात 35 टक्के वाढ झाली आहे. संपुर्ण वर्षात घाऊक (होलसेल) कर्जात 54 टक्के कपात करत त्याचे प्रमाण 19 हजार 840 कोटी रुपयांवर आणले आहे.
कंपनीचा एकत्रित करोत्तर नफा (पॅट) 2022-23 या वित्तीय वर्षासाठी एक हजार 623 कोटी रुपये नोंदविला गेला असून त्यात वार्षिक 52 टक्के वाढ झाली आहे. 31 मार्च 2023 ला संपलेल्या निव्वळ चौथ्या तिमाहीसाठी करोत्तर नफा गत चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 46 टक्क्यांनी वाढून 501 कोटी रुपयांवर गेला आहे.
कंपनीच्या चमकदार आर्थिक कामगिरीबद्दल बोलताना एल अॅण्ड टी फायनान्स होल्डींग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. दिनानाथ दुभाषी म्हणाले की, आम्ही आखलेला लक्ष्य 2026 या चार वर्षाच्या धोरणात्मक योजनेतील 2022-23 हे पहिले वर्ष आहे. आमचे रिटेल कर्जाचे प्रमाण 75 टक्क्यांवर पोहचल्याचे जाहीर करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. लक्ष्य 2026 मध्ये निश्चित केलेल्या 80 टक्कयांपर्यंत अधिक रिटेल कर्जाच्या उद्दीष्टानजीक आम्ही जवळपास पोहचलो आहे. मालमत्तेच्या उत्तम गुणवत्तेसह रिटेल बुक मध्ये झालेली ३५% वाढ तसेच होलसेल बुक मधील निर्णायक ५४% झाल्यामुळे हे यश साध्य झाले.
वर्षभरात व्यूहात्मक धोरणांच्या अंमलबजावणीमुळे योजनेतील लक्ष्य वेगाने गाठण्यात कंपनीला मोठी मदत झाली आहे. ग्राहकाभिमुख आणि सातत्यपुर्ण फिनटेक अॅट स्केल या धोरणांसाठी आम्ही आमची ही गती भविष्यातही काय ठेवू. ग्राहकांच्या अर्थव्यवस्थेभोवती फिरणारे रिटेल कर्ज प्रकार कंपनी सतत सादर करत राहील आणि त्याआधारे एकमेकांना पूरक वितरण (क्रॉससेल) आणि अधिकाधिक विक्री करणाऱ्या योग्य अशा सक्षम वितरण शाखा तसेच अत्तुत्तम वितरण धोरणाची निर्मिती केली जाईल, असे श्री. दुभाषी यांनी स्पष्ट केले.
एलटीएफएचने 31 मार्च 2023 ला संपलेल्या वित्तीय वर्षात रिटेलच्या सर्व प्रकारात अतिशय बळकट अशी वाढ साध्य केली आहे.
कंपनीने वर्षभरात ग्रामीण भागात 16 हजार 910 कोटी रुपयांचे कर्जवितरण केले आहे. विविध भौगोलिक प्रदेशात खोलवर आणि सक्षम अशी वितरण यंत्रणा उभी करणे तसेच व्यूहात्मक पुढाकारावर लक्ष केंद्रीत करत योग्य अशा कर्ज प्रकारांचे विस्तारीकरण याआधारे ग्रामीण भागात कंपनीने ही वाढ साध्य केली आहे.
देशात ट्रॅक्टरसाठी वित्तसहाय्य क्षेत्रातील बाजारपेठेत कंपनी अव्वलस्थानी आहे. 31 मार्च 2023 ला संपलेल्या वित्तीय वर्षात शेतकऱ्यांना सहा हजार 450 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आलेला आहे. त्यात वार्षिक 25 टक्के वाढ झाली आहे. तसेच निव्वळ चौथ्या तिमाहीत कंपनीने उच्चांकी वित्तसहाय्य साध्य केले आहे आणि संपुर्ण वित्तीय वर्षात एक लाखांपेक्षा अधिक ट्रॅक्टरसाठी वित्तपुरवठा करण्याचा महत्वाचा टप्पा साध्य केला आहे. या वाढीचे श्रेय आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांबरोबरील भागीदारींच्या बळकटीकरणाला दिले जाते, ज्यामुळे बाजारातील हिस्सा वाढण्यास मदत झाली. किसान सुविधा योजना आणि पुनर्वित्त यांसारख्या दर्जेदार योजनांमुळे ग्रामीण ग्राहक टिकवून ठेवण्यास मदत झाली आहे.
शहरी भागासाठी वित्तपुरवठ्यात वार्षिक 72 टक्के वाढ होऊन 31 मार्च 2023 ला संपलेल्या वित्तीय वर्षात ते 16 हजार 727 कोटी रुपयांवर गेले आहे. वित्तीय वर्ष 2023 मध्ये गृह कर्ज, मालमत्तेच्याआधारे कर्जाच्या मासिक वितरणाने महत्वाचा 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दुचाकीसाठी चौथ्या तिमाहीत उच्चांकी एक हजार 727 कोटी रुपयांचे कर्जवितरण झाले असून त्यात वार्षिक 25 टक्के वाढ नोंदविली गेली आहे. कंपनीने ई-एग्रीगेटर्ससह मजबूत भागीदारी आणि ग्राहक कर्ज व्यवसायातील उत्तम संधीद्वारे ग्राहकांची व्याप्ती वाढविली आहे.
एसएमईसाठी वित्तपुरवठ्यात 31 मार्च 2023 ला संपलेल्या वित्तीय वर्षात कंपनीने एक हजार कोटी रुपयांचा महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. वित्तीय वर्ष 22 मध्ये दोन वितरण केंद्राआधारे सुरू केलेला प्रायोगिक तत्वावरील वितरण प्रकल्प आता विविध भौगोलिक प्रदेशात 20 वितरण केंद्रांपर्यंत वाढला आहे. या व्यवसायाच्या चॅनेल विस्तारासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हे सर्वसमावेशक धोरण असेल.
ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेले आणि वित्तीय वर्ष 22 च्या चौथ्या तिमाहीत प्रत्यक्ष वापरात आलेले कंपनीचे प्लॅनेट APP हे स्वायत्त प्रवासाच्या वाटचालीतील मुख्य घटक ठरला आहे. सवंर्धित अशा डायरेक्ट टू कस्टमर चॅनेलची निर्मिती करत ग्राहकांच्या प्रतिबद्धतेची पुनर्कल्पना करण्याच्या पायाभूत संकल्पनेवर हे APP तयार केलेले आहे. APP ग्राहक-केंद्रित वैशिष्ट्यांसह भू-अज्ञेयवादी सोर्सिंग, संग्रह आणि सर्व्हिसिंग चॅनेल म्हणून कार्य करते. हे APP कृषीविषयक अॅडव्हायझरी, एज्युकेशन कोर्सेस, युटिलिटी पेमेंट्स, इन्कम एक्सपेन्स ट्रॅकर इत्यादीसारखी इतर अनेक वैशिष्ट्ये देखील प्रदान करते. वित्तीय वर्ष 23 मध्ये APPरुपी चॅनेलच्या माध्यमातून 240 कोटी रुपयांपेक्षा अधिक संकलन आणि ग्राहकांच्या 45 लाखांहून अधिक विनंत्यांबाबत सेवा पुरविलेली आहे. हे APP 2.8 लाखाहून अधिक ग्रामीण ग्राहकांपर्यंत पोहोचले आहे आणि आतापर्यंत तीस लाख डाउनलोड्सचा टप्पा त्याने ओलांडला आहे. तसेच, आजपर्यंत या APPने 1,600 कोटी (वेबसाइटसह) रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.