- भारतातील पुरुष व स्त्रियांमध्ये विस्तृतरित्या प्रचलित असलेल्या अतिक्रियाशील मूत्राशयाच्या (ओएबी) समस्येवर परवडण्याजोग्या दरात उपचार
- अनेक आंतरराष्ट्रीय उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार शिफारस केले जाणारे फर्स्ट–लाइन (सर्वप्रथम दिले जाणारी) उपचार
हैदराबाद, : एमएसएन लॅब्ज या हैदराबादस्थित, संशोधनाधारित व पूर्णपणे एकात्मिकृत, जागतिक औषध कंपनीने फेसोबिग या फेसोटेरोडाइन फ्युमारेटचे जगातील पहिले जैवसमतुल्य जेनेरिक व्हर्जन बाजारात आणत असल्याची घोषणा केली. अतिक्रियाशील मूत्राशय (ओएबी) आणि लघवीवर नियंत्रण नसणे (यूआय) या अवस्थांवर, फेसोबिग हा, अनेकविध आंतरराष्ट्रीय उपचार मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शिफारस केला जाणारा फर्स्ट लाइन फार्माकोथेरपी पर्याय आहे.
“भारतीय रुग्णांच्या यातना दूर करण्याच्या दृष्टीने सर्व महत्त्वाच्या उपचारांमध्ये परवडण्याजोगी औषधे आणण्यासाठी संशोधन करण्याप्रती आमच्या बांधिलकीचा एक भाग म्हणून फेसोबिग (फेसोटेरोडाइन) बाजारात आणले आहे,” असे एम.एस.एन समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. एमएसएन रेड्डी म्हणाले.
एमएसएन समूहाचे कार्यकारी संचालक श्री. भरत रेड्डी यावेळी म्हणाले, “फेसोबिगमुळे अतिक्रियाशील मूत्राशय अर्थात ओव्हरअॅक्टिव ब्लॅडर (ओएबी) या अवस्थेतून बाहेर येण्यात तर रुग्णांना मदत होईलच. शिवाय, या अवस्थेशी निगडित सामाजिक व मानसिक अवघडलेपण दूर करून आत्मविश्वासाने जीवन जगण्यातही या रुग्णांना मदत होईल. या औषधाची किंमत सर्वांना परवडण्याजोगी असेल याची खात्री आम्ही केली आहे. जेणेकरून, ह्याचा लाभ बहुसंख्य रुग्णांना मिळावा.”
आतिथी वक्त्या कन्सल्टण्ट युरोलॉजिस्ट डॉ. के. ललिता यांनी भारतातील ओएबीच्या प्रचलनाबद्दल माहिती दिली. 50 वर्षांवरील 3 पैकी 1 स्त्री या अवस्थेतून जात असते आणि त्याचा परिणाम स्त्रियांच्या आयुष्याच्या दर्जावर होतो, असे अभ्यासातून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.
केआयएमएस हॉस्पिटलमधील स्त्रीरोग विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अनुराधा कोडुरी यांनी या अवस्थेशी निगडित सामाजिक कलंकाच्या भावनेवर भाष्य केले. जागरूकतेच्या अभावामुळे बहुसंख्य रुग्णांना या अवस्थेवर उपचार करवून घेण्यास लाज वाटते आणि वाढत्या वयाचा परिणाम म्हणून ते ही अवस्था स्वीकारतात. मात्र, ह्या समस्येची परिणती पुढे अनेक वैद्यकीय जटीलतांमध्ये होऊ शकते.
कन्सल्टण्ट युरोलॉजिस्ट डॉ. ए. व्ही. रविकुमार यांनी ओएबीवर उपचार करण्यासाठी उपलब्ध असलेले अनेक वैद्यकीय मार्ग स्पष्ट करून सांगितले. ह्यांत वर्तनाधारित उपचार, औषधे व शस्त्रक्रियांचा समावेश होता.
अतिक्रियाशील मूत्राशय (ओएबी) या अवस्थेविषयी :
अतिक्रियाशील मूत्राशय (ओएबी) अवस्थेमध्ये ओटीपोटाच्या स्नायूंच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे मूत्राशयातून अनियंत्रित गळती होत राहते. ह्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते. भारतात यूआयचे (लघवीवर नियंत्रण नसण्याची अवस्था) प्रचलनही तुलनेने अधिक आहे. ग्रामीण भागात हे 10% तर शहरी भागांत 34% आहे. यूआय ही अवस्था प्राणघातक नसली, तरी ह्यामुळे अवघडलेपणा, लाज वाटणे व आत्मविश्वास कमी होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
अतिक्रियाशील मूत्राशय या अवस्थेतून जाणाऱ्या रुग्णांना दिवसभरात वारंवार मूत्राशय रिकामे करण्याची गरज तातडीने भासत राहते. ह्या लक्षणामुळे आयुष्यातील मानसिक, सामाजिक, व्यावसायिक, घरगुती व लैंगिक अंगांवर परिणाम होतो. आजाराचे प्रचलन वयाबरोबर वाढते आणि जागरूकतेच्या अभावामुळे खूप कमी रुग्णांमध्ये या आजाराचे निदान होते व त्यांना उपचार मिळू शकतात.