NHI/मुंबई, मे २०२३: पिरामल ग्रुपची रिअल इस्टेट शाखापिरामल रियल्टीच्या पिरामल वैकुंठ (ठाणे), पिरामल रेवंता (मुलुंड) आणि पिरामल अरण्य (भायखळा) या बृहन्मुंबई क्षेत्रातील तीन आलिशान निवासी प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (O.C.) मिळाले असल्याची घोषणा करताना कंपनीला आनंद होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच पिरामल वैकुंठच्या क्लस्टर १ च्या यशस्वी हस्तांतरणानंतर लगेचच हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. उच्च दर्जाची निवासी विकासकामे पूर्ण करून देण्याच्या पिरामल रियल्टीच्या क्षमतेचे हे द्योतक आहे. पिरामल रेवंता मधील जवळ-जवळ २५० अपार्टमेंट्सच्या स्वामित्वहक्कांच्या हस्तांतरणाचे काम आधीच सुरू झाले आहे.
पिरामल रियल्टीचे ग्राहकांविषयीचे सखोल ज्ञान आणि आलिशान तरीही वापरसुलभ घरे पुरविण्यावर देण्यात येणारा भर यांना या कंपनीच्या यशाचे श्रेय देता येईल. जिथे रहिवाशांना त्यांच्या सभोवतीच्या नैसर्गिक भूदृश्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होता येईल, त्यांचे संवर्धन करता येईल व त्यांच्याशी नाते जोडता येईल असा परिसर घडविण्यासाठी प्रकल्पांच्या रचनेत आगळ्यावेगळ्या बायोफिलिक, अर्थात निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या रचनांचा समावेश करून घेत कंपनीने आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व निवासी प्रकल्पांमध्ये कंपनीने सातत्याने केलेली चांगली कामगिरी म्हणजे ग्राहकांकडून जीवनशैलीविषयी सजग राहत बनविण्यात आलेल्या रचना आणि अधिक चांगल्या निवासी जागा निर्माण करणे यांसारख्या आधुनिक संकल्पनांसह तंत्रज्ञानाने सुसज्ज उपाययोजना स्वीकारल्या जात असल्याचे द्योतक आहे. यामुळे कंपनीला आपल्या ग्राहकांच्या सतत बदलत असणाऱ्या गरजा पूर्ण करत या स्पर्धेमध्ये पुढे राहणे शक्य होत आहे.
पिरामल रियल्टीचे सीईओ गौरव सोहनी म्हणाले, “तीन प्रकल्पांसाठी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (O.C.) प्राप्त करणे हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमचे प्रतिष्ठित ग्राहक #ThePiramalLife अनुभवण्याच्या वाटेवरील आपल्या प्रवासाचा शुभारंभ करत असताना त्यांचे प्रेमाने स्वागत करण्याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. आमचे कष्ट, समर्पण आणि आधुनिक जगण्याचा अनुभव देऊ करणारे प्रकल्प पूर्ण करण्यातील आमची निपुणता यांचाच हा पुरावा आहे. आमच्या टीमच्या भक्कम प्रयत्नांच्या माध्यमातून आमचे प्रकल्प आमच्या घरांना अत्यंत गरजेचे असे व्यक्तिमत्व मिळवून देत राहतील.”
ते पुढे म्हणाले, “बायोफिलिया अर्थात निसर्गाशी जवळीकीच्या तत्वाचा वापर करून डिझाइन करण्यात आलेल्या आमचे निवासी प्रकल्पांमध्ये इनडोअर आणि आउटडोअर लिव्हिंगमधील सीमारेषा अगदी सहजपणे एकमेकींत मिसळतात, व आमच्या रहिवाशांना शांत आणि संतुलित जगण्याचा अनुभव देतात जिथे त्यांच्या स्वास्थ्याची जोपासना होते. अत्याधुनिक सोयीसुविधा आणि भव्य निसर्गदृश्ये यांचा मेळ साधणारे हे प्रकल्प कम्युनिटी लिव्हिंग या संकल्पनेची व्याख्या नव्याने रचणारे आहेत. या असाधारण गृहसंकुलांमध्ये जेव्हा कुटुंबं आपली घरकुले उभी करताना आपले स्वप्न वास्तवात उतरताना पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
पिरामल रियल्टीकडे मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या पुरस्कार प्राप्त प्रकल्पांचा प्रभावी पोर्टफोलिओ आहे, ज्यात सध्या १३ दशलक्ष चौरस फूटांचे क्षेत्र विकासाधीन आहे. कंपनीच्या उल्लेखनीय विकासप्रकल्पांमध्ये पिरामल अरण्य (भायखाळा), पिरामल महालक्ष्मी, पिरामल रेवंता (मुलुंड) आणि पिरामल वैकुंठ (ठाणे) यांचा समावेश आहे.