ठळक मुद्दे
कामकाजातून मिळणारे उत्पन्न 9.2% वाढून ते रु.402 कोटी इतके झाले
ऑपरेटिंग मार्जिनमध्ये तीव्र वाढ दिसून आली असून ईबीआयटीडीए 30.9% नोंदविला आहे
आर्थिक वर्ष 23च्या पहिल्या तिमाहीत करोत्तर नफा 23.7% या दराने वाढला
आर्थिक वर्ष 2023च्या पहिल्या तिमाहीत ईपीएस रु.56.4 होता, आर्थिक वर्ष 2022च्या पहिल्या तिमाहीत रु.45.6 इथका होता कॅट
मुंबई, जुलै 30 : व्हीएसटी इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 23च्या पहिल्या तिमाहीत अधिक चांगली कामगिरी नोंदवली. या आर्थिक वर्षाच्या जूनच्या अखेरीस संपलेल्या तिमाहीत टॉप-लाइन (विक्री) तसेच बॉटम-लाइनमध्ये (नफा) सुदृढ वाढीची नोंद केली. जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी एकूण उत्पन्न रु.413 कोटी आहे. ही 9.5 टक्के वाढ होती, तर निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या या तिमाहीच्या तुलनेने 23.7 टक्के वाढ झाली. आर्थिक वर्ष 2023च्या पहिल्या तिमाहीत व्हीएसटीचे उत्पन्नसुद्धा टप्प्याटप्प्याने वाढून एकूण उत्पन्न रु.402 कोटी इतके नोंदविण्याल आले.
इनपुट इन्फ्लेशन (कामगार, कच्चा माल किंवा वाहतुकीमध्ये पुरवठा आणि मागणीमधील असमतोल) जास्त असूनही व्हीएसटीने ऑपरेटिंग मार्जिन मोठ्या प्रमाणात वाढविले. ईबीआयटीडीए मार्जिन वाढून 30.9 टक्के झाले आणि त्यातून कंपनीची भक्कम ब्रँड पॉवर प्रतिबिंबीत होते.
2023च्या पहिल्या तिमाहीत करपूर्व नफा (पीबीटी) रु.117.1 कोटी झाला तर गेल्या वर्षीच्या या तिमाहीमध्ये करपूर्व नफा रु.94.8 कोटी इतका होता. जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) रु.56.4 होते तर जून 2022 मध्ये याच तिमाहीत ईपीएस रु.45.6 इतका होता. या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील कामगिरी, कंपनीसाठी रिकव्हरीतील वेग अनुकूल असल्याचे दिसून येत आहे.
भक्कम ब्रँड पॉवर व कार्यक्षम भांडवल वाटपामुळे व्हीएसटीने भक्कम आर्थिक कामगिरी सादर केली असून कंपनीने 24 टक्के नफ्याची नोंद केली आणि मार्जिनमध्ये 30 टक्के वाढ झाली आणि आपल्या सदस्यांसाठी एक भक्कम तिमाही सादर केली. आर्थिकदृष्ट्या अनेक अडथळे असताना नफा वाढवत प्रगती करण्याची कंपनीला आशा आहे.”, असे व्हीएसटी इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य देब गोपू म्हणाले.
तुमच्या कंपनीच्या ‘टोटल’ या फ्लॅगशिप ब्रँडने टोटल टी3 लाँच करत किंग-साइझ सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. हा डेमि स्लिम फॉरमॅट असून प्रथमच फिंगल फ्रेश टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आहे. या लाँचमुळे कंपनी प्रीमिअम कन्झ्युमरपर्यंत पोहोचेल आणि विविध पातळ्यांवर उपयुक्त बदल घडवून आणण्यास मदत होईल.