मे 2023: मुंबई, भारत – किडझानिया इंडिया, लहान मुलांच्या एज्युटेनमेंट पार्कमधील अग्रणी, TVS, भारतातील आघाडीच्या दुचाकी उत्पादकांपैकी एक असलेल्या TVS सोबत किडझानिया मुंबई आणि किडझानिया दिल्ली एनसीआर येथे TVS रेसिंग एक्सपीरियन्स सेंटर सुरू करण्यासाठी नवीन भागीदारीची घोषणा केली.
या भागीदारीतून TVS किडझानिया उद्यानांत एक एक्सपीरियन्स सेंटर म्हणजे अनुभव केंद्र तयार करणार आहे. जेणेकरुन उद्यानात येणाऱ्या तरुण अभ्यागतांना रेसिंगचा उत्साह अनुभवण्यासाठी सुरक्षित आणि नियंत्रित वातावरण मिळेल. रेसिंग एक्सपीरियन्स सेंटरमध्ये वास्तविक जीवनातील ट्रॅक, हाय-टेक सिम्युलेटर आणि अस्सल रेसिंग गीअर्स आहेत. ज्यामुळे मुलांसाठी एक गुंतवून ठेवणारा आणि रोमांचकारी अनुभव मिळेल. एक लोकप्रिय अनुभव घेण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या या केंद्रांत रेसिंगची आवड आणि मुलांना मजेदार व आकर्षक पद्धतीने खेळाबद्दल शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट किडझानिया’ने ठेवले आहे.
नाविन्यपूर्ण, आकर्षक आणि अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी, किडझानिया’च्या वतीने रेसिंगची आवड निर्माण करण्यासाठी आणि खेळात हुशार शर्यतपटू बनवणारी मूल्यं रुजविण्यासाठी तयार केलेल्या तीन आकर्षक भूमिका तयार केल्या आहेत. या अनुभव केंद्रात विविध वयोगटातील क्रियाकलापांचा समावेश असेल. ज्यामध्ये आवड टिकवून ठेवण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होईल. बाइक असेंब्लीसारख्या उपक्रमांमुळे सांघिक सहभागाला प्रोत्साहन मिळेल, तर डिझाईन स्टुडिओ आणि असेंब्ली पॉइंट रेसिंग मोटरबाइकबद्दल सखोल ज्ञान प्रदान करतील. रेसिंग सिम्युलेटर तरुण अभ्यागतांना त्यांच्या पहिल्या रेसिंग परवान्याद्वारे आणि पोडियम फोटो-ऑपद्वारे यशाची भावना देईल. याठिकाणी भेट देणाऱ्यांना TVS अपाचे मिनीबाइकवर रेसट्रॅकवर देखील प्रवेश मिळू शकतो. ज्यामुळे इतर अभ्यागतांशी शर्यत करण्याची संधी मिळेल.
आज एक्सपीरियन्स सेंटर सुरू झाल्याची घोषणा करताना किडझानिया इंडिया’चे मुख्य भागीदारी अधिकारी – प्रेरणा उप्पल म्हणाल्या, “अशा नाविन्यपूर्ण आणि अनन्य अनुभवाच्या संकल्पनेसाठी दोन नवीन-युगातील ब्रँड एकत्र येत असल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. किडझानिया आणि टीव्हीएस मोटर कंपनी यांच्यातील भागीदारी केवळ सहयोग नव्हे तर दोन भिन्न संस्कृतींच्या अभिसरणाचे प्रतिनिधित्व करते. किडझानिया’चे प्रायोगिक शिक्षण आणि परस्परसंवादी खेळावर लक्ष केंद्रित करणे, टीव्हीएस मोटर’ची नवकल्पना आणि शाश्वत वचनबद्धता, मुलांसाठी खरोखर अद्वितीय आणि रोमांचक संधी निर्माण करण्याची, रेसिंग आणि गतिशीलतेच्या जगाचा शोध घेण्याची आहे. मुलांच्या जीवनावर काय परिणाम होईल हे पाहण्यासाठी आता आणखी प्रतीक्षा करणं कठीण आहे.”
TVS मोटर कंपनी, हेड बिझनेस – प्रीमियम, श्री. विमल सुंबली, म्हणाले, “भारतातील मुलांना मोटारसायकल रेसिंगचा पहिला अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी किडझानिया सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी भारतातील तरुण दुचाकीस्वारांसाठी सुरक्षित पण रोमांचकारी रेसिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला आणखी प्रोत्साहन देते. प्रेरणेची सुरुवात लहानपणापासून होते. मनात आकांक्षेचे बीज बालपणापासून पेरले जाते. या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन, सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात रेसिंगचा आनंद मुलांना शिकता यावा, तो अनुभवण्यासाठी एक मजेदार आणि मनोरंजक अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे. देशात टू-व्हीलर रेसिंगला प्रोत्साहन देण्यासाठी TVS नेहमीच आघाडीवर राहिली आहे. हा अनोखा अनुभव केवळ मुलांसाठी एक संस्मरणीय अनुभव निर्माण करणारा नाही तर पुढच्या पिढीला रेसिंगची आवड निर्माण करण्यास प्रेरणा देईल हा विश्वास आम्हाला वाटतो.”
येथे भेट देणाऱ्यांना अॅक्टिव्हिटी झोनमध्ये एक्सपीरियन्स सेंटर एक गुंतवून ठेवणारा आणि मनोरंजक मंच प्रदान करते. सुरक्षितता आणि अनुभवाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, रेसिंग एक्सपीरियन्स सेंटर विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. उदाहरणार्थ, 15 मिनिटांच्या क्रियाकलापासाठी एकाच वेळी आठ मुलांचे स्वागत केले जाते, जिथे त्यांच्यासाठी टीव्हीएस रेसिंग इतिहास आणि उपलब्ध विविध क्रियाकलापांबद्दल पर्यवेक्षकाद्वारे एक माहितीपर सत्र आयोजित करण्यात येईल. RR 310 असेंब्ली, RR 310 डिझाइन, TVS रेसिंग सिम्युलेटर वापरून TVS Racer आणि TVS Racetrack या चार वेगवेगळ्या पर्यायांमधून मुलांना निवड करणे शक्य आहे. ब्रँडने दिलेल्या निर्धारित वेळेत त्यांना या क्रियाकलापांत सहभागी होता येईल. त्यांनी हे क्रियाकलाप वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व सहभागींना स्मृतीचिन्ह/स्मरणिका मिळेल. फ्रेमसह एक छायाचित्र मुलांना थरारक अनुभवाची आठवण करून देईल. अशा अप्रतिम उपक्रमांसह, किडझानिया आणि टीव्हीएस’च्या सहयोगी प्रयत्नांसह, एक्सपीरियन्स सेंटर सर्व तरुण रेसिंग इच्छुकांसाठी एक अविस्मरणीय आणि समृद्ध अनुभव देईल.
_____________________________________________________________________________