
डी कॉकची फिफ्टी व्यर्थ
याचा पाठलाग करताना लखनऊला 20 षटकांत 7 गडी गमावून 171 धावाच करता आल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 70 धावा केल्या. त्यांनंतर काईल मेयर्सने 48, आयुष बडोनीने 21, दीपक हुडाने 11 धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, राशिद खान आणि नूर अहमदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
लखनऊचा डाव
याचा पाठलाग करताना लखनऊचे ओपनर काईल मेयर्स आणि क्विंटन डी कॉकने संघाला चांगली सुरूवात करून दिली, दोघांनी पहिल्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात काईल मेयर्सला 48 धावांवर बाद करत मोहित शर्माने ही जोडी फोडली. नंतर डी कॉक आणि दीपक हुडाने डाव पुढे नेला. मात्र तेराव्या षटकात डी कॉकला 11 धावांवर बाद करत शमीने ही जोडी फोडली. त्यानंतर पंधराव्या षटकात मोहित शर्माने स्टॉयनिसला 4 धावांवर बाद केले. तर सोळाव्या षटकात राशिद खानने डी कॉकला 70 धावांवर बाद केले. त्यानंतर अठराव्या षटकात नूर अहमदने निकोलस पूरनला 3 धावांवर बाद केले. त्यानंतर एकोणिसाव्या षटकात मोहित शर्माने आयुष बडोनीला 21 धावांवर तर कृणाल पंड्याला शून्यावर बाद केले. यानंतर लखनऊला 20 षटकांत 171 पर्यंतच मजल मारता आली.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या लखनऊच्या विकेट
- पहिलीः नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहित शर्माने काईल मेयर्सला राशिद खानच्या हाती झेलबाद केले.
- दुसरीः तेराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीने दीपक हुडाला राहुल तेवतियाच्या हाती झेलबाद केले.
- तिसरीः पंधराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहित शर्माने मार्कस स्टॉयनिसला शमीच्या हाती झेलबाद केले.
- चौथीः सोळाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राशिद खानने क्विंटन डी कॉकला बोल्ड केले.
- पाचवीः अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नूर अहमदने निकोलस पूरनला शमीच्या हाती झेलबाद केले.
- सहावीः एकोणिसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहित शर्माने आयुष बडोनीला नूर अहमदच्या हाती झेलबाद केले.
- सातवीः एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहित शर्माने कृणाल पंड्यााल डेव्हिड मिलरच्या हाती झेलबाद केले.
गिलच्या नाबाद 94 धावा
गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 94 धावा केल्या. त्यानंतर वृद्धिमान साहाने 81, हार्दिक पंड्याने 25 तर डेव्हिड मिलरने 21 धावा केल्या. लखनऊकडून आवेश खान आणि मोहसिन खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
गुजरातचा डाव
प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातला ओपनर वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी 12 षटकांपर्यंत फटकेबाजी करत पहिल्या गड्यासाठी 142 धावांची भागीदारी केली. दोघांनीही आपापली अर्धशतके यादरम्यान पूर्ण केली. तेराव्या षटकात वृद्धिमान साहाला 81 धावांवर बाद करत आवेश खानने ही जोडी फोडली. त्यानंतर हार्दिक पंड्या व गिलने दुसऱ्या गड्यासाठी 42 धावांची भागीदारी केली. सोळाव्या षटकात हार्दिक पंड्याला 25 धावांवर बाद करत मोहसिन खानने ही जोडी फोडली. त्यानंतर शुभमन गिल आणि डेव्हिड मिलरने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 227 वर नेली. गिलने नाबाद 94 तर मिलरने नाबाद 21 धावा केल्या.
अशा पडल्या गुजरातच्या विकेट
- पहिलीः तेराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आवेश खानने वृद्धिमान साहाला प्रेरक मंकडच्या हाती झेलबाद केले.
- दुसरीः सोळाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहसिन खानने हार्दिक पंड्याला कृणाल पंड्याच्या हाती झेलबाद केले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11…
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स : अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, श्रीकर भरत, शिवम मावी, जयंत यादव.
लखनऊ सुपर जायंट्स : कृणाल पंड्या (कर्णधार), क्विंटन डिकॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, कर्ण शर्मा, मार्कस स्टॉयनिस, स्वप्निल सिंह, यश ठाकूर, रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि आवेश खान.
इम्पॅक्ट प्लेयर्स : आयुष बडोनी, अमित मिश्रा, डॅनिएल सॅम्स, युद्धवीर सिंह, प्रेरक मंकड.
गुजरात प्लेऑफपासून 2 विजय दूर
गुजरातने या मोसमात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 10 सामन्यांमध्ये 7 विजय आणि 3 पराभव पत्करले आहेत. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने चमकदार कामगिरी केली आणि आता त्यांचा संघ 14 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. 2 सामने जिंकताच संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.
लखनऊविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू डेव्हिड मिलर, राशिद खान, नूर अहमद आणि जोशुआ लिटल हे असू शकतात. याशिवाय शुबमन गिल, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा हे खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
लखनऊने 10 पैकी 5 सामने जिंकले
लखनऊने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 5 सामने जिंकले आणि 4 गमावले आहेत. एक सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. संघाचे 11 गुण आहेत. गुजरातविरुद्धच्या संघाचे चार विदेशी खेळाडू मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, काइल मेयर्स आणि नवीन-उल-हक असू शकतात. याशिवाय रवी बिश्नोई, कृणाल पंड्या आणि आयुष बडोनी हे खेळाडू संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत.
लखनऊवर गुजरातचे पारडे जड
गुजरात आणि लखनऊ या दोन्ही संघांचा हा दुसरा हंगाम आहे. गतविजेत्या गुजरात संघाने लखनऊवर वर्चस्व राखले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने झाले असून, त्यात गुजरातने तीनही वेळा विजय मिळवला आहे.