नवी दिल्ली : टीटीके प्रेस्टिज या भारतातील सर्वात विश्वसनीय होम अप्लायन्स ब्रॅण्डने आधुनिक भारतीय ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आलेले आणखी एक नवोन्मेष्कारी सोल्यूशन – स्वच्छ हॉब लाँच केले आहे. नवीन लाँच करण्यात आलेल्या हॉबच्या श्रेणीमध्ये उच्चस्तरीय वैशिष्ट्ये आहेत, जे भारतीय किचनमध्ये सुलभ कूकिंग व क्लीनिंग देते.
सोईस्कर स्वच्छ हॉबमध्ये टीटीके प्रेस्टिजचे ट्रेडमार्क लिफ्टेबल बर्नर आहे, जो होम-कूक्सना अत्यंत सुलभ क्लीनिंग अनुभव देतो. कूकिंगच्या वेळी गॅस स्टोव्हवर पडलेल्या कूकिंग स्पिल्सना साफ करण्यासाठी अधिक वेळ व मेहनत लागते. प्रेस्टिजच्या स्वच्छ हॉबसह साफसफाई अगदी सहजपणे करता येऊ शकते. हॉबमध्ये अधिक सोयीसुविधा व सुरक्षिततेसाठी स्पेशल लिफ्ट-अॅण्ड-लॉक यंत्रणा आहे.
स्वच्छ हॉबमध्ये ८ मिमी जाड व उच्च दर्जाची मजबूत काच आहे, जी दीर्घकाळापर्यंत कार्यक्षमता व आकर्षकतेची खात्री देते. हा हॉब ५ वर्षांच्या वॉरंटीसह येतो. ग्राहकांच्या जीवनामध्ये अधिक सुलभतेची भर करण्यासाठी लिफ्टेबल बर्नर सेटमध्ये ड्रिप ट्रे आहे, जे सुलभ क्लीनिंगसाठी फूड वेस्ट, विशेषत: लिक्विड्स गोळा करते.
स्वच्छ हॉब २ बर्नर, ३ बर्नर व ४ बर्नर मॉडेल्समध्ये उपलब्ध असून किंमत ११९९५ रूपयांपासून सुरू होत १८९९५ रूपयांपर्यंत आहे. जम्बो बर्नर ३ व ४ बर्नर मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. टीटीके प्रेस्टिज ३० टक्के सूटची स्पेशल सुरूवातीची ऑफर देखील देत आहे. नवीन श्रेणी भारतभरातील प्रेस्टिज एक्सक्लुसिव्ह लोकेशन्स, निवडक डिलर आऊटलेट्स, सर्व आघाडीचे ईकॉमर्स व्यासपीठ आणि ब्रॅण्डचे एक्सक्लुसिव्ह ऑनलाइन स्टोअर https://shop.ttkprestige.com/ वर उलपब्ध आहे.