मुंबई : गोरेगावातील अवघ्या 13 वर्षीय बानी देवसानी या मुलीने आपल्या मिरॅकल गेम ऑफ माइंड च्या माध्यमातून इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नामांकन मिळवले आहे. कु. बानी हिने आपल्या या अनोख्या कलेचे दर्शन घडवित उपस्थित सिने, नाट्य, व कला क्षेत्रातील दिग्गजां कडून वहावा मिळवली..
दिंडोशी मधील न्यू म्हाडा कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या श्री.व सौ. संगीता संजय देवसानी यांची कन्या कु.बानी संजय देवसानी (वय वर्षे 13) हीचा दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी मेयर हॉल ,जुहू लेन,अंधेरी पश्चिम येथे India’s Book of World record मध्ये नामांकन प्राप्त झाल्या प्रीत्यर्थ “miracle game of mind” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कु.बानी देवसानी हिच्या डोळ्यांवर India’s Book of World record च्या सदस्यांनी दोन जाड कापडी पट्ट्या बांधल्या त्या नंतर कु. बानी दिवसानी हिने उपस्थित लोकांनी स्टेजवर येऊन तिच्या हातात दिलेल्या वस्तू फक्त हाताने स्पर्श करुन वस्तू, रंग, कपडे, बॅग, इतर विषयी तंतोतंत माहीती सांगीतली.
1) क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, बसकार्ड इ. चे रंग व नंबर
2) ड्रायव्हींग लायसन्स नंबर व संपण्याची तारीख
3) फक्त हाताला स्पर्श करुन व्यक्तीने घातलेला ड्रेस व त्याचा रंग, बुटांचा रंग, बॅगेचा रंग. इत्यादी.हे सर्व पाहणाऱ्यांचा डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता व सर्वांना हे सर्व चमत्कारिक आणि आश्चर्यकारक वाटत होते.
यावेळी जाणकार तज्ञ मंडळींकडून राजकीय, सामाजिक, आणि सिने क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कु. बानी देवसानीला पुढील पुरस्कार मिळाले.
1) World Record Achiever (by India Book of World Record) Maverick with super sensors 2023.
2) Certificate Of Appreciation by Dadasaheb Phalke Memorial foundation)
यावेळी राजकीय सामाजिक वैद्यकीय सिने क्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होती त्यांनी कु.बानी देवसानी हीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.