MUMBAI/NHI: पार्क क्लब व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी होणाऱ्या विविध ४ वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेत ९६ मुलामुलींमध्ये विजेतेपदासाठी चुरस होईल. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाप्रेमी पी.व्ही. देसाई व रामेश्वर लोहे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी ९.०० वा. पार्क क्लबच्या वातानुकुलीन सभागृहात होईल. निर्णायक फेरीनंतर पारितोषिक वितरण समारंभ पार्क क्लबचे पदाधिकारी अॅड. राजेंद्र पै, वरदा चुरी, प्रमोद तेलंग, प्रदीप शिरगांवकर, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
८ वर्षाखालील वयोगटात आरव रॉय, धीवांश बाफना, इरा गव्हाणे, कार्तिक शेळके, पराव जोशी, प्रद्युम्ना जाधव, सर्वा परेलकर, शौर्या जिंदाल, विवान कदम, युवेन झव्हेरी आदी २५ खेळाडूंमध्ये; १० वर्षाखालील वयोगटात फिडे गुणांकित नक्ष मलिक व मनोमय शिंगटे यांच्यासह गिरीजा लाब्रे, मनस्वी म्हापसेकर, नचिकेत उपाध्याय, साईराज खवळे, समृद्धी जोशी, श्रीआंश सावंत, विधिता जोशी आदी २४ खेळाडूंमध्ये; १२ वर्षाखालील वयोगटात अथर्व कोरान्ने, हृदय मणियार, रुद्र कांदपाल, मानस हाथी, आरेन मल्होत्रा, विवान भुत्ता, जींना धर्मश्री, आर्यन सावंत आदी फिडे गुणांकित बुध्दिबळपटूसह २५ खेळाडूंमध्ये तर १४ वर्षाखालील वयोगटात मोहमद कुरेशी, कर्णाव रस्तोगी, भव किशन, वैष्णवी अय्यर, साची कुळकर्णी आदी फिडे गुणांकित खेळाडूंसह २२ खेळाडूंमध्ये अटीतटीच्या लढती होतील. विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ६० पुरस्कार दिले जाणार आहेत.