पेप्सी®ने केली समांता रुथ प्रभूची ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून नियुक्ती
‘राइज अप, बेबी!’ म्हणत संपूर्ण पिढीला देणार प्रेरणा
स्त्रियांच्या दुर्दम्य चैतन्याला वंदन करणारे नवीन अभियान
https://www.youtube.com/watch?v=yTwZrY6KFdU
राष्ट्रीय, 27 एप्रिल, २०२३: चाकोरीबाह्य कथांच्या माध्यमातून तरुणाईची अतूट उत्कटता आणि अविचल चैतन्य जिवंत करणाऱ्या पेप्सी®ने आपल्या ‘राइज अप, बेबी!’ ह्या नवीन प्रभावी ब्रॅण्ड पोझिशनिंगचे आणखी एक प्रस्तुतीकरण सर्वांपुढे आणले आहे. तरुणाईचा आदर्श आणि देशभरातील स्त्रियांसाठी प्रेरणास्थान असलेल्या समांता रुथ प्रभूचा ह्या अभियानात समावेश करण्यात आला आहे. ह्या अभियानाच्या निमित्ताने समांताने सर्वांत नवीन ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून पेप्सी®च्या तारकासमूहात प्रवेश केला आहे.
आपल्याला उत्कटतेने आवडणाऱ्या गोष्टींची कास धरून तसेच दुर्दम्य विश्वास कायम राखून, जगाने घालून दिलेले सामाजिक नियम मोडीत काढण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन देणे, हे ह्या तळ ढवळून काढणाऱ्या व प्रेरणादायी अभियानाचे उद्दिष्ट आहे. ह्यासाठी समाजातील लिंगाधारित भूमिकांबद्दलच्या साचेबद्ध संकल्पनांची नव्याने मांडणी करण्यासाठी अभियान सज्ज आहे. भारतीय स्त्रियांना दैनंदिन आयुष्यात तोंड द्याव्या लागणाऱ्या अनेक पुरातन परिस्थितींचे चित्रण ह्यात केले आहे. विशिष्ट वयात लग्न न केल्याबद्दल प्रश्न विचारले जाण्यापासून तसेच कामासाठी रात्री उशिरा बाहेर राहणे किंवा कृतीवर आधारित अशा नेतृत्वाच्या भूमिका स्वीकारणे ह्याबद्दल खिल्ली उडवली जाण्यापर्यंत कितीतरी परिस्थितींना स्त्रिया तोंड द्यावे लागते. स्त्रियांना आयुष्यभर सहन कराव्या लागणाऱ्या लक्षावधी छुप्या टिप्पण्या तसेच दबावांवर हे अभियान भाष्य करते.
बाकीच्यांना आपली पत ठरवू न देणाऱ्या तसेच स्वत:च्या लयीत वाटचाल करणाऱ्या, मुक्त विचारांच्या स्त्रियांना, ‘राइज अप बेबी’ ह्या तीन प्रभावी शब्दांतून पकड घेणारे हे अभियान, वंदन करते. समांता रुथ प्रभू ही प्रस्थापित चौकटी नाकारणाऱ्या स्त्रियांची प्रतिनिधी आहे. तिला स्वत:च्या व्यक्तिमत्वाबद्दल आत्मविश्वास आहे आणि तिला हव्या त्या पद्धतीने ती स्वत:चे आयुष्य जगते. प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीत स्वत:च्या बळावर उभी राहणारी म्हणून देशातील लक्षावधी स्त्रिया तिच्याकडे बघतात. पेप्सी®च्या नवीन अभियानात, तिचे चैतन्यपूर्ण व लवचीक व्यक्तिमत्व दाखवण्यात आले आहे. अविचल आत्मविश्वास, खरेपणा व धैर्याच्या जोरावर स्वत:च्या आयुष्याची सूत्रे स्वत:च्या हाती घेण्यासाठी स्त्रियांना प्रेरित करण्याचे उद्दिष्ट ह्या अभियानापुढे आहे. आधुनिक स्त्री तिच्या स्वप्नांचा व आंतरिक इच्छांचा अविरत पाठलाग करत राहते ह्या वादातीत सत्याचा प्रतिध्वनी अभियानात दुमदुमत आहे.
पेप्सीको इंडियाच्या पेप्सिकोला विभागाच्या कॅटेगरी लीड सौम्या राठोड ह्या अभियानाबद्दल म्हणाल्या, “तरुण पिढीतील समन्वयाचे दर्शन घडवण्यासाठी पेप्सी कायमच प्रयत्नशील राहिली आहे. समाजाने घालून दिलेल्या नियमांच्या पलीकडे जाताना तरुणाई दाखवत असलेल्या दुर्दम्य चैतन्याचे दर्शन घडवणे हे उद्दिष्ट आमच्या पूर्वीच्या दोन अभियानांमागे होते. ह्यावेळी भारतातील स्त्रियांचे सशक्तीकरण करणारे अभियान आम्हाला राबवायचे आहे आणि त्यांच्या अविचल आत्मविश्वासाला वंदन करायचे आहे. समांता रुथ प्रभू ही स्वतंत्र, धाडसी, मुक्त अशा आधुनिक भारतीय स्त्रीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच आमच्या ‘राइज अप, बेबी!’ ह्या ब्रॅण्ड पोझिशनिंगमध्ये चपखल बसणारी आहे. आम्ही समांताचे पेप्सी परिवारात स्वागत करतो. तिच्यासोबत भविष्यकाळातही अशी अनेक चाकोरीबाह्य अभियाने करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
अभिनेत्री समांता रुथ प्रभू अभियानाबद्दल म्हणाली, “समाजाने घालून दिलेले साचे मोडून स्त्रियांनी स्वत:च्या मनाप्रमाणे वागले पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटते. म्हणूनच हे अभियान माझ्यासाठी अधिक खास होते. कारण, ह्यामध्ये नवीन पिढीतील स्त्रियांच्या अविचल व सातत्यपूर्ण चैतन्याचे उदाहरण दिले आहे आणि आपल्या व्यक्तिमत्वातील छटा सर्वांपुढे उघड करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली आहे. पेप्सीशी जोडले जाणे माझ्यासाठी रोमहर्षक अनुभव आहे आणि सर्व चाहते कधी एकदा ‘राइज अप, बेबी!’ ह्या घोषवाक्यामुळे आणि संपूर्ण अभियानामुळे प्रेरित होत आहेत असे मला झाले आहे.”
हे नवीन अभियान ३६० अंशांच्या प्रसिद्धीद्वारे प्रसारित केले जाणार आहे. ह्यात टेलीव्हिजन, डिजिटल, आउटडोअर व सोशल मीडिया अशा सर्व माध्यमांचा समावेश असेल. पेप्सी® सर्व आधुनिक व पारंपरिक दुकानांत तसेच आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर, फेसाळ लेमन व लाइम स्वादांत, सिंगल/मल्टि-सर्व्ह पॅक्समध्ये उपलब्ध आहे.