मुंबई : ‘अर्थ डे’ निमित्त ‘गोटूझीरो’ मिशनचा एक भाग म्हणून फोक्सवॅगन ग्रुपने २०५० पर्यंत कार्बन मुक्त होण्याची मोहीम हाती घेतली आहे. औद्योगिक स्तरावर नवीकरणीय ऊर्जेच्या विस्तारासह संपूर्ण जागतिक पुरवठा साखळी आणि उत्पादन जीवन चक्रात कार्बन प्रभावशून्यतेच्या उद्दिष्टांवर ग्रुप सातत्याने लक्ष केंद्रित करून आहे अशी माहिती स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा यांनी दिली. ‘अर्थ डे’ निमित्त स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्कोडा समूहातील कर्मचारी, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयचे अधिकारी, सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे व्यवस्थापन संघ, डीलर, पुरवठादार साखळीतील भागीदार उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना, पियुष अरोरा म्हणाले की,”पृथ्वी दिनानिमित्त, आम्ही ऊर्जा आणि डिकार्बोनायझेशन, कचरा आणि घेरा घालणे, आणि निरोगी जीवनशैली या तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करीत आहोत. डिकार्बोनायझेशन, शून्य कचरा, जलसंधारण, सामाजिक जबाबदारी, जैवविविधता आणि अनुपालन स्थितिस्थापकत्व व जबाबदारी मध्ये आमच्या ग्रुपचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि त्याने केलेल्या स्थिर प्रगतीमुळे आम्हाला आमच्या पर्यावरणीय आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहण्यास मदत झाली आहे. या वर्षी आम्ही आमचे प्रयत्न अजून एक पाऊल वर नेत आहोत आणि हे हवामान संरक्षणासाठी पर्यावरणीय चळवळ तयार करण्याकरिता जागतिक व कॉर्पोरेट जबाबदारी व्यतिरिक्त वैयक्तिक जबाबदारीवर लक्ष केंद्रित करून साध्य करणार आहोत.
या कार्यक्रम प्रसंगी शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची करण्यासाठी कंपनीने पॅरिस २०५० च्या हवामान उद्दिष्टांच्या अनुषंगाने कार्बनची प्रभावशून्यता (न्यूट्रॅलिटी) साध्य करण्याची आपली उद्दिष्टे पुन्हा मांडली आहेत आणि हे जागतिक, कॉर्पोरेट आणि वैयक्तिक जबाबदारीचा समावेश असलेल्या समग्र दृष्टिकोन वापरून ते करणार आहेत.