मुंबई : सोन्याने केवळ भारतीय सराफा बाजारातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मुसंडी मारली आहे. चांदीने पण सगळीकडे आगळीक केली आहे. जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
अमेरिकेत व्याजदर गेल्या एका वर्षात 500 bps वाढले असल्याने मंदीचा धोका, महागाईचे संकट वाढले आहे. या सर्व संकटांच्या दरम्यान, सोन्या-चांदीने नेहमीच इतर मालमत्तांच्या तुलनेत वरचढ कामगिरी केली आहे आणि ऐतिहासिक दोन अंकी परतावा दिला आहे. यावेळी अक्षय्य तृतीयेला सात शुभ योग जुळून येत असल्याने सोने आणि चांदी खरेदीसाठी हा दिवस अतिशय खास आणि शुभ आहे. या अक्षय्य तृतीयेला बार, नाणे, दागिने, भांडी, डिजिटल गोल्ड/डिजिटल सिल्व्हर, गोल्ड ईटीएफ/सिल्व्हर ईटीएफ, सार्वभौम गोल्ड बॉण्ड आणि एक्सचेंज प्लॅटफॉर्मद्वारे मौल्यवान धातूंची खरेदी नक्कीच करावी, रिद्धीसिद्धी बुलियन्स लिमिटेड सीईओ व व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज कोठारी असे म्हणाले