मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि चड्डा डेव्हलपर्स ॲन्ड प्रमोटर्स (सीडीपी) या दोघांकडून खाजगी आणि सरकारी भागीदारीतून (पीपीपी) बदलापूर जवळील वांगणी पश्चिम येथील कारव गावात चड्डा रेसिडेन्सी च्या दुसर्या टप्प्याच्या सुरुवातीची योजना आखली आहे. या प्रकल्पामध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्या अंतर्गत ८० एकरावर १३३ टॉवर्स चे बांधकाम करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यामध्ये १११४ फ्लॅट्स उपलब्ध असून १ बीएचके चे हे फ्लॅट्स लॉटरी तत्त्वावर रु ११,९९,००० या किंमतीस उपलब्ध असतील. त्याच बरोबर प्रधान मंत्री आवास योजने (पीएमे) योजने अंतर्गत असलेल्या लेबर स्कीम (कामगार योजना) अंतर्गत त्यांची किंमत रु ९,९९,००० असेल. यासाठीची लॉटरी या आधीच सुरु झाली असून शेवटचा दिवस हा २८ एप्रिल २०२३ आहे. विकासकांकडून या फ्लॅट्सचा ताबा २०२४-२५ मध्ये देण्याचे वचन दिले आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२१ मध्ये सुरु करण्यात आला होता आणि या अंतर्गत ३ हजार फ्लॅट्सची विक्री करण्यात आली होती. आकर्षक किंमत आणि उत्तम स्थळ असल्यामुळे दुसर्या टप्प्याला ही अशाच प्रकारचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
या विषयी घोषणा करतांना चड्डा रेसिडेन्सी च्या व्यवस्थापकीय संचालिका डिम्पल चड्डा यांनी सांगितले “ म्हाडाच्या सहकार्याने चड्डा रेसिडेन्सीच्या दुसर्या टप्प्याच्या सुरुवातीची घोषणा करतांना आंम्हाला आनंद होत आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्याने ही भागीदारी पुढे सुरु ठेवण्याबद्दल आमचा विश्वास वाढला आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांना परवडणार्या दरात आम्ही घरे देऊ शकलो. पीमे स्कीम चा एक भाग होऊन २०२४-२५ पर्यंत हाऊसिंग फॉर ऑल च्या सरकारच्या लक्ष्या मध्ये आमचे योगदान देतांना आंम्हाला अभिमान वाटतो.”
चड्डा डेव्हलपर्स ॲन्ड प्रमोटर्स (सीडीपी) ही मुंबईतील एक रियल इस्टेट कंपनी आहे. कंपनी बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण बांधकाम, वेळेत डिलिव्हरी आणि नाविन्यपूर्ण डिझाईन साठी प्रसिध्द आहे. सीडीपी कडून महाष्ट्रात अनेक निवासी आणि व्यावायिक प्रकल्प पूर्ण केले असून कंपनी भारतातील लोकांना परवडणार्या दरात घरे उपलब्ध करुन देण्यास वचनबध्द आहे.