प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात लिंबू हे असतेच. लिंबू एक बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबामधील सी- व्हिटॅमिन्समुळे अनेक रोगांचे निवारण होते. लिंबू फक्त आरोग्यासाठीच नाहीतर सौदर्य उपचारांवर देखील गुणकारी आहे. लिंबामधील एटी बॅक्टेरिअल आणि एटी ऑक्सिडंट गुणधर्म रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
अगदी प्राचीन काळापासून लिंबाचा वापर औषधाप्रमाणे करण्यात येत आहे. थकवा अथवा कंटाळा आल्यास लिंबूरस घेतल्याने तुम्हाला पटकन फ्रेश वाटतं. दिवसभर फ्रेश राहण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबूरस पिळुन घेऊ शकता. अधिक चांगल्या परिणामांसाठी त्यात एक चमचा मध घाला. अशा या बहुगुणी लिंबाचे अनेक फायदे जाणून घेण्यासाठी ही माहिती अवश्य वाचा.
त्वचेसाठी लिंबाचे फायदे
त्वचेवर लिंबाचा चांगला परिणाम होतो. नैसर्गिक अॅंटीसेप्टिक गुणधर्मांमुळे लिंबू त्वचा समस्यांवर फारच गुणकारी ठरते. कारण लिंबात मुळातच नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यातील लाइटनिंग एजेंटमुळे त्चचेवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे अनेक सौंदर्य उत्पादनात लिंबाचा वापर केला जातो. लिंबामुळे तुमची त्वचा उजळ तर होतेच शिवाय त्यामुळे सनबर्न सारख्या अनेक समस्या दूर होतात. लिंबाचा वापर पिंपल्स, ब्लॅकहेडस, चेहऱ्यावरील सुरकुत्या अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी करण्यात येतो.
सुंदर दिसण्यासाठी लिंबाचा कसा वापर कराल ?
1. बाऊलमध्ये एका अंड्यांचा पांढरा भाग घ्या त्यात काही थेंब लिंबूरस मिसळा आणि हे मिश्रण एकजीव करा. चेहऱ्यावर हे मिश्रण लावून ते सुकल्यावर मास्कप्रमाणे काढून टाका. नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येईल.
2. दह्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन चेहरा आणि मानेवर लावा. काही मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा चेहरा विनाकारण फार चोळू नका. या मिश्रणामुळे तुमचा चेहरा अगदी फ्रेश दिसू लागेल.
3. बदाम तेलाचे काही थेंब आणि लिंबू रस समान प्रमाणात घ्या आणि एकत्र करा. या मिश्रणाला वीस मिनीटं चेहऱ्यावर लावा. 4जर तुमची त्वचा तेलकट असेल तर लिंबू तुमच्यासाठी अगदी वरदानच ठरेल. पाण्यात काही थेंब लिंबू रस मिसळा आणि हे मिश्रण कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स अशा अनेक समस्या कमी होऊ शकतील.
5. लिंबू आणि मध एकत्र चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात. यासाठी थोड्या मधात काही थेंब लिंबूरस मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि त्याची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येईल. लिंबू आणि मध चेहऱ्यावर लावण्यामुळे अनेक सौंदर्य फायदे तुम्हाला मिळू शकतात.
6. चेहरा चमकदार आणि हातपायांच्या ढोपर, कोपराची त्वचा मऊ करण्यासाठी त्यावर लिंबू रस लावा. या त्वचेवर वापरलेल्या लिंबाची साल चोळा. ज्यामुळे त्वचेवरील काळसरपणा कमी होईल.
7. लिंबू तुमच्या कोरड्या आणि फुटलेल्या ओठांवर देखील नक्कीच गुणकारी ठरू शकेल. यासाठी दुधाच्या सायीमध्ये काही थेंह लिंबूरस आणि मध मिसळा. या मिश्रणाचा एक नैसर्गिक लिपबाम तयार करा. हा नैसर्गिक लिपबाम लावल्याने तुमचे ओठ मऊ आणि मुलायम होतील.
8. काकडीच्या रसात एक चमचा लिंबूरस मिसळा. सुती कापड अथवा कापसाच्या मदतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. चांगल्या परिणामांसाठी ही क्रिया कमीतकमी दोन वेळा करा. काही मिनीटांनी चेहरा धुवून टाका.
9.लिंबाच्या सालींमध्ये मीठ आणि पेपरमिंट तेल मिसळून स्क्रब तयार करा. हा स्क्रब तुमच्या पायांना लावून मसाज करा. काही वेळाने पाय धुवून कोरडे करा. या उपायामुळे तुमचे पाय मऊ आणि चमकदार होतील.
10. त्वचा फारच तेलकट असेल तर मुलतानी माती आणि लिंबू रस एकत्र करुन त्वचेवर लावा. मुलतानी माती आणि लिंबूरसाची एक जाडसर पेस्ट तयार करा. हा फेसपॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या उपायामुळे तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल.
11.अंडरआर्म्स काळे झाले असल्यास त्यावर लिंबूरस अगदी जादूप्रमाणे काम करू शकते. यासाठी दोन चमचे हळद, एक चमचा बेकींग सोडा, तीन चमचे मध आणि अर्ध्या लिंबाचा रस घ्या. या सर्व मिश्रणाची एक जाडसर पेस्ट तयार करा. तयार पेस्ट अंडरआर्म्सला लावून सुकल्यावर वीस मिनीटांनी तो भाग पाण्याने स्वच्छ करा. या उपायामुळे तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ तर होतील शिवाय त्यावरील नको असलेले केसदेखील कमी होतील.
केसांसाठी लिंबाचे फायदे
त्वचेप्रमाणे केसांच्या सौदर्यावरदेखील लिंबाचा खूपच चांगला परिणाम होतो. कोरडे आणि निस्तेज केस असो किंवा केसांना फाटे फुटणे, कोंडा होणे अशा समस्यां असो तुम्ही यासाठी लिंबूचा वापर करू शकता. लिंबू केसांमध्ये लावल्यामुळे केसांमध्ये नैसर्गिक चमक येते.
लिंबाचा केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कसा उपयोग कराल?
1.नारळाचे तेल केसांना मजबूत करते. यासाठी नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळा. त्यामुळे यापुढे केसांना तेल लावताना नारळाच्या तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि या तेलाने केसांच्या मुळांना मसाज करा.
2.जर तुम्हाला केसांमध्ये सतत कोंडा होण्याची समस्या असेल तर तुमच्या कोणत्याही हेअर ऑईलमध्ये लिंबाचा रस मिसळा. या तेलाच्या वापराने तुमचा कोंडा हळूहळू कमी होईल.
3.जर तुम्ही केसांना कलर केलं असेल आणि तुम्हाला आता तो कलर नको असेल तर लिंबाने तुम्ही हा कलर काढून टाकू शकता. लिंबामध्ये नैसर्गिक सायट्रिक अॅसिड असतं. ज्यामुळे कलर केलेल्या केसांवर लिंबूरस लावल्याने केसांचा कलर फिकट होतो.
4.तीन चमचे बेसणामध्ये एक चमचा लिंबू रस मिसळा. थोडं पाणी मिसळुन तयार मिश्रण केसांना लावा. सुकल्यावर केस थंड पाण्याने स्वच्छ करा. केस सुकल्यावर नारळाचं तेल आणि लिंबू रस समप्रमाणात घेऊन केसांना लावा. यामुळे तुमचे केस काळे आणि धनदाट होतील.
5. केसांना मेहंदी लावताना मेंहदी पावडरमध्ये अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबूरस मिसळा. यामुळे तुमचे केस गळणं कमी होईल शिवाय केसांची वाढदेखील चांगली होईल.
6. एक मोठा चमचा लिंबूरस घ्या त्याच दोन मोठे चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा. या मिश्रणाला तुमच्या केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित लावा. चाळीस मिनीटांनी कोमट पाण्याने केस धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा प्रयोग करा. यामुळे तुमचे केस गळणे कमी होईल.
7. जर तुम्हाला काळे आणि धनदाट केस हवे असतील तर एक चमचा लिंबूरसामध्ये दोन चमचे पाणी मिसळा. यात चार चमचे आवळ्याचा रस अथवा आवळ्याची पावडर मिसळा. हे मिश्रण एक तास तसेच ठेवा. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा आणि एक तास केस तसेच ठेवा. एक तासांनंतर केस धुवून काढा मात्र लक्षात ठेवा केस धुण्यासाठी शॅम्पू अथवा साबणाचा वापर करू नका. केस धुताना डोळ्यांची काळजी घ्या. दर चार दिवसांनी हा प्रयोग करा.काही दिवसांनी तुमचे केस काळे आणि घनदाट दिसू लागतील.
8. जर तुमचे केस गळत असतील तर दोन चमचे लिंबाच्या रसात एक अर्धा चमचा कॅस्टर ऑईल मिसळा. या मिश्रणाला केसांमध्ये लावून मसाज करा. तीस मिनीटांनी शॅम्पू आणि कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. दोन आठवड्यातून एकदा असं केल्याने तुमचे केस कमी होईल.
9. जर तुमच्या केसाच्या त्वचेवर खाज येत असेल तर केसांना दही लावून थोड्यावेळाने केस पाण्याने स्वच्छ करा. केस सुकल्यावर लिंबू रस आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन केसांना लावा. काही आठवड्यांनी तुमच्या केसांमध्ये खाज येणं कमी होईल.
10. केसांंमध्ये उवा झाल्यास तर लिंबू रस आणि आल्याचा रस केसांमध्ये लावा. एक तासांनी केस स्वच्छ धुवा. केस धुतल्यावर केसांमध्ये लिंबू रस आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन लावा. यामुळे तुमच्या डोक्यातील उवा कमी होतील.
आरोग्यासाठी लिंबाचे फायदे
आंबटगोड चवीच्या लिंबाचे शरीरावरदेखील चांगले फायदे होतात. लिंबू अथवा लिंबूरस अनेक गोष्टींवर उपाय म्हणून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आहारात घेतलेल्या लिंबाच्या रसामुळे तुमची पचनसस्था सुरळीत राहते. शिवाय लिंबाच्या रसामुळे शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात. सहाजिकच तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. नियमित लिंबूपाणी प्यायल्यास तुमचं शरीर सुडोैल होण्यास मदत होते.
1. बेली फॅट आणि वजन कमी करण्यासाठी दररोज एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळुन ते पाणी अनोशी पोटी प्या. हवं असल्यास तुम्ही त्यात एक चमचा मध टाकू शकता. ज्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही राहाल. सहा महिने सतत हे पाणी प्यायल्याने तुम्ही फीट आणि सुंदर दिसाल.
2. मधूमेहीनी लिंबू पाणी पिण्याचे अनेक चांगले फायदे असतात. शिवाय यामुळे त्यांचे वजनही कमी होते. शरीर हायड्रेट राहील्याने दिवसभर निवांत वाटते.
3. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास लिंबू पाणी पिणे नेहमीच चांगले ठरेल. कारण नियमित लिंबूपाणी घेतल्यास हळूहळू ही समस्या कमी होते.
4. लिंबूपाणी ब्लडप्रेशर आणि मधूमेहींसाठी उपयुक्त तर आहेच शिवाय लिंबूपाण्याने ताण आणि नैराश्यावरदेखील मात करता येते.
5.अपचनामुळे पोटात दुखत असल्यास लिंबाच्या रसात आल्याचा रस आणि साखर मिसळून प्या. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळेल. तसंच जेवताना भाजी आणि डाळीवर लिंबू पिळा. ज्यामुळे तुम्हाला जेवण अधिक स्वादीष्ट तर लागेलच शिवाय ते पचण्यासदेखील मदत होईल.
रिकाम्या पोटी लिंबूपाणी घेल्यास काय होतं?
दररोज सकाळी काहिही न खाता कोमटपाण्यात लिंबू पिळून घेतल्याने अपचनाची समस्या कमी होते. शिवाय असे पाणी यकृतासाठी एक डिटॉक्स म्हणून उपयुक्त ठरते.
लिंबापासून तयार केलेली उत्पादने
पंतजली लेमन हनी फेस वॉश –
पंतजलीची उत्पादने आयुर्वेदिक असतात. या फेसवॉशमुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होतं. शिवाय या फेसवॉशमुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्सदेखील येत नाहीत. कारण यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. लिंबामुळे त्वचा उजळ होते आणि मधामुळे त्वचा मॉश्चराइजदेखील होते.
लिंबाचा व्यवस्थित वापर केलेल्या गार्नियर क्रीममुळे त्वचा उजळ आणि चमकदार दिसू लागते. शिवाय यामुळे तुमचे सुर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून संरक्षण होते. ही क्रीम कोणत्याही त्वचा प्रकारासाठी योग्य आहे.
लिंबाचे दुष्परिणाम
लिंबाचे अनेक चांगले फायदे तर आपण पाहिलेच पण लक्षात ठेवा लिंबाचे काही दुष्परिणाम देखील आहेत. कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास ती नुकसानकारकच असते. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही अती प्रमाणात लिंबाचा वापर केला तर त्याचे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.
1. आधीच सांगितल्याप्रमाणे लिंबामध्ये सायट्रीक अॅसिड मुबलक प्रमाणात असते. लिंबाचा अतीवापर केल्यास तुमचे दात संवेदनशील होतात आणि दुखू लागतात.
2. जर तुमची त्वचा अती संवेदनशील असेल तर लिंबाचा रस तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकतो. कारण अती संवेदनशील त्वचेवर लिंबू रस लावल्यास त्वचेला खाज येणे, त्वचेवर सूज येणे, लाल पुरळ येणे या समस्या होऊ शकतात.
3. जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल तर लिंबाचे सेवन तुमच्यासाठी मुळीच योग्य नाही. कारण लिंबामधील अॅसिड तुमचा त्रास अधिक वाढू शकतं.
4. अती प्रमाणात लिंबाचा रस घेतल्यास तुम्हाला तोंड येण्याची समस्या होऊ शकते.
5. काही लोकांना लिंबाची अलर्जी असते. लिंबाचे सेवन केल्यास अशा लोकांना मायग्रेन अथवा अस्थमाचा त्रास होऊ शकतो.