पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक अहमदला घेऊन जात असताना त्याची आणि अशऱफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली
काय घडली घटना?
पोलीस अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांची मेडिकल चाचणी करण्यासाठी आणण्यात आलं. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक आणि अशरफ या दोघांना मेडिकलसाठी नेण्यात येत होतं. त्यावेळी तिथे ANI, PTI या वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी अतिकशी बोलत होते. अतीक आणि अशरफ मीडियाशी बोलत असतानाच या दोघांवर पोलिसांच्या घेऱ्यात घुसून गोळीबार केला. या भागात अंधाधुंद गोळीबार झाला त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. गोळ्या लागल्यामुळे अतिक आणि अशरफ या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ANI ने या संदर्भातला व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अतीकचे शेवटचे शब्द काय होते?
तुम्ही काही म्हणू इच्छिता का? तुम्हाला अंत्ययात्रेत नेलं गेलं नाही. “हो आम्हाला नाही नेलं गेलं… पण मुख्य गोष्ट ही आहे की..” बस यापुढे अतीक अहमद काही बोलणार तितक्यात त्याच्यावर आणि अशरफवर गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांवर ज्या गोळ्या झाडल्या त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अतीक अहमदच्या मुलाचं एन्काऊंटर कऱण्यात आलं. त्यापाठोपाठ आता अतीक आणि अशरफ या दोघांची हत्या करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वीच असद अहमद चमकमकीत ठार
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद अहमद आणि शूटर गुलामलाही झाशीमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ठार केले होते. दोघेही उमेश पाल हत्याप्रकरणातील प्रकरणातील मुख्य आरोपी होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघांना हत्यारं टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. या चकमकीत दोघांचाही मृत्यू झाला होता.