प्रयागराज : उमेश पाल हत्याकांडातील गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा पंटर गुलाम मोहम्मद यांचे यूपी पोलिसांनी झाशी येथे एन्काउंटर केले. असदने उमेशच्या हत्येचा कट रचला आणि नंतर त्याच्या साथीदारांसह प्रयागराजमध्ये दिवसाढवळ्या त्याची हत्या केली होती. असदने यावर्षी 12वीची परीक्षा लखनऊमधील एका प्रसिद्ध महाविद्यालयातून दिली होती, ज्याचा निकाल अजून यायचा आहे. माफिया अतिकला पाच मुले आहेत. असद तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याचे दोन मोठे भाऊ उमर आणि अली तुरुंगात आहेत, तर दोन धाकटे भाऊ अल्पवयीन असून ते बालगृहात आहेत. असद अजूनही फरार होता, पण गुरुवारी चकमकीत मारला गेला.
वयाच्या 12 व्या वर्षी केला होता गोळीबार
गेल्या आठवड्यात असदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ 2017चा आहे. त्यावेळी त्याचे वय सुमारे 12 वर्षे होते. एका लग्न समारंभात तो हवेत गोळीबार करत होता. एकत्र बसलेले कुटुंबीय कौतुकाने त्याला आणखी गोळ्या झाडायला सांगत होते. बहा गोळीबार चकियाच्या एका विवाह सोहळ्यात होता. लोक सांगतात की अतिक अहमद लहानपणापासूनच आपल्या मुलांना गोळीबाराचे प्रशिक्षण देत असे.
राग एवढा की थेट शिक्षकालाच केली होती मारहाण
असद रागीट स्वभावाचा होता. त्याचा राग घरी तसेच शाळेत अनेकदा समोर यायचा. तो लहान असताना, तो शाळेतील टग-ऑफ-वॉर स्पर्धेत त्याच्या वर्गाचे प्रतिनिधित्व करत होता. त्या चुरशीच्या लढतीत त्यांचा संघ हरला. असदला इतका राग आला की त्याने सामन्यात रेफ्री असलेल्या शिक्षकाला बेदम मारहाण केली होती. शाळा व्यवस्थापनाला माफियाच्या कुटुंबाची इतकी भीती वाटली की, त्यांनी आपल्या शिक्षकाला मारहाण झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यातही केली नाही.
परदेशात जायचे होते, कुटुंबाच्या गुन्हेगारी रेकॉर्डमुळे पासपोर्ट मंजूर झाला नाही
असदने यावर्षी लखनऊ येथील महाविद्यालयातून 12वीची परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल अजून आलेला नाही. असद अभ्यासात चांगला होता, त्याला वकील व्हायचे होते. त्याने कायद्याचा पुढील अभ्यास करण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्याला परदेशात जायचे होते, मात्र अतिक-अश्रफ आणि त्याच्या दोन मोठ्या भावांच्या गुन्हेगारी रेकॉर्डमुळे त्याला पासपोर्ट काढता आला नाही.
अतीकने आपल्या मुलाला बॉम्बर होण्यापासून रोखले
असद अहमद जेव्हा घराभोवती बॉम्बस्फोटाच्या घटना ऐकायचा आणि पाहायचा तेव्हा त्यालाही हे सर्व करावेसे वाटायचे. अतीकला बॉम्बस्फोट आवडत नव्हते. बॉम्बस्फोट त्याचे फायदे-तोटे त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते, त्यामुळे त्याने असदला त्यापासून दूर राहण्याची सूचना केली. यानंतर मुलाचे पिस्तुलाशी आकर्षण वाढले आणि तो शूटर झाला. त्यानंतर अतिकने त्याला कधीच अडवले नाही.
अतिक तुरुंगात गेल्यानंतर सांभाळायचा बिझनेस
अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ तुरुंगात गेल्यानंतर अतीकची मुले कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत. गेल्या वर्षभरात अतिकची मोठी मुले उमर आणि अली या दोघांना अटक करण्यात आली होती. यानंतर असद हा व्यवसाय पाहत असे. मात्र, मोठा निर्णय असल्यावर अतिकची पत्नी शाइस्ता परवीनच घ्यायची.
असदला उमेश पालला मारण्याची गरज का होती?
एसटीएफचा एक अधिकारी सांगतो- जेव्हा जेव्हा अतिकला त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला राजकारणात उतरवायचे असते तेव्हा तो एक भीती निर्माण करतो. त्याने स्वतः राजकारणात प्रवेश केल्यावर त्याचे नाव चांदबाबा खून प्रकरणात पुढे आले होते. आमदार राजू पाल खून प्रकरणात भाऊ अशरफचे नाव आल्यावर तो राजकारणात उतरला. आता त्याला त्याचा मुलगा असदला राजकारणात लाँच करायचे होते, म्हणून असदने उमेश पालची हत्या केली.
उमेश पाल याची कार सुलेमसराई परिसरातील एका रस्त्यावर थांबली होती. उमेशच्या गनरने खाली उतरून गेट उघडले. फाईल धरून फोनवर बोलत असताना उमेश खाली उतरला. त्यानंतर उमेशवर गोळ्या झाडण्यास सुरुवात झाली.
रस्त्यालगतच्या दुकानातून हाफ जॅकेट आणि टोपी घातलेला एक माणूस बाहेर येतो, पिस्तूल काढतो आणि उमेशवर गोळीबार करू लागतो. उमेश उठून रस्त्यावर धावत असताना तोही त्याच्या मागे गेला. काही वेळाने परतला. तेव्हापासून त्या व्यक्तीचा चेहरा कोणीही पाहिला नाही. ही व्यक्ती गुलाम मोहम्मद असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुलामने अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले
गुलाम हा प्रयागराजचा रहिवासी होता. त्याने अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. गुलामला शिक्षणात फारसा रस वाटला नाही, त्यामुळे त्याने अगदी लहानपणापासूनच नेतेगिरी करायला सुरुवात केली. आधी तो विद्यापीठात विद्यार्थी नेता झाला. अनेक पक्षांमध्ये त्याने विविध पदेही भूषवली.
विद्यापीठाच्या मुस्लिम वसतिगृहात राहणाऱ्या सदाकत खान याच्याशी त्यांची भेट झाली. सदाकतनेही अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे, शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तो वसतिगृहात राहत होता. उमेशच्या हत्येचा कट त्याच्या खोलीतच रचला गेला.
2017 मध्ये खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात गेल्यावर अतिकची पहिल्यांदा भेट झाली
गुलामने महापालिकेत कंत्राटी काम सुरू केले. तो चंदन सिंग नावाच्या कंत्राटदाराकडे काम करायचा. एकदा पैशामुळे संबंध बिघडले. गुलामने सिव्हिल लाइन्समध्ये चंदन सिंगची गोळ्या झाडून हत्या केली. काही दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला. यानंतर तो पुन्हा कंत्राटी कामात गुंतला. छोटे छोटे कंत्राट घेऊ लागला. 2015 मध्ये त्याचे लग्न झाले. गुलामने प्रेमविवाह केला होता.
2017 मध्ये अतिक अहमदला विद्यापीठातील मारहाण प्रकरणी नैनी तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याचवेळी गुलामही तुरुंगात होता. या प्रकरणासंदर्भात तो अतिक अहमदकडे गेला. अतिकने नैनी तुरुंगातच चंदनच्या कुटुंबीयांना बोलावून पैसे घेऊन समेट करण्यास सांगितले.
भाऊ म्हणाला, एन्काउंटर झाला तर मृतदेह घेणार नाही
उमेश पाल चकमकीत गुलाम मोहम्मदचे नाव समोर आल्यावर गुलामच्या घराला बेकायदेशीर ठरवून प्रशासनाने बुलडोझर चालवला. यावर गुलामचा भाऊ राहिल हसन म्हणाला की, त्याने आम्हाला रस्त्यावर आणले. तो भाऊ आहे, पण भावाच्या लायकीचे काही काम केले पाहिजे होते.
त्याने आमच्या कुटुंबाचे नाव कलंकित केले. अशा परिस्थितीत आमच्या कुटुंबीयांनी आधीच ठरवले होते की जर एन्काउंटर झाले तर आम्ही गुलामचा मृतदेह घेण्यासाठी जाणार नाही.
माझ्या मुलाला शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा
गुलामची आई म्हणाली होती – मीसुद्धा आई आहे. उमेशला आईही आहे. गुलामला शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे. म्हातारपणात त्यांनी आमची मान खाली घालायला लावली. इतक्या अनोळखी लोकांसमोर मी कधीच घराबाहेर पडले नाही. हा दिवसही त्याने दाखवून दिला. त्याने चूक केली आहे, ज्यासाठी त्याला शिक्षा होईल.
गँगस्टर अतिकचा मुलगा असदचे झाशीत एन्काउंटर:शूटर गुलामचाही खात्मा, उमेश पाल हत्येच्या 49 दिवसांनी यूपी पोलिसांचे यश
उमेश पाल हत्येप्रकरणी वॉन्टेड गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद यांना यूपी पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. हे एन्काउंटर झाशीमध्ये झाले. दोघांवर 5 लाखांचे बक्षीस होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याजवळ विदेशी शस्त्रे सापडली आहेत. 24 फेब्रुवारी रोजी उमेश पालची हत्या केल्यापासून तो फरार झाला होता. पोलिस सतत त्यांचा शोध घेत होते आणि झाशी येथे त्यांचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले.
‘धन्यवाद योगीजी! न्याय मिळाला’: उमेश पालची पत्नी जया पाल यांची प्रतिक्रिया, आई म्हणाली- मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल
उमेश पाल हत्याकांड प्रकरणी फरार असलेल्या असद अहमदला पोलिसांनी चकमकीत ठार केल्यानंतर उमेश पालची पत्नी जया पाल यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. असद हा अतिक अहमदचा मुलगा होता. असदसोबत शूटर गुलामही चकमकीत मारला गेला आहे.
उमेश पाल हत्याकांडानंतर मारेकरी फरार झाले होते. त्याला पकडण्याचे काम उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सला देण्यात आले होते. गुरुवारी, एसटीएफच्या पथकाने अतिकचा मुलगा असद आणि या हत्येमध्ये सहभागी असलेला शूटर गुलाम यांना चकमकीत ठार केले. या दोघांचाही एसटीएफच्या पथकाने खात्मा केला. या पथकाचे नेतृत्व एसटीएफचे डीएसपी नवेंदू सिंह आणि डीएसपी विमल करत होते.
उमेश पाल हत्ये प्रकरणी पोलिस चकमकीत ठार झालेल्या असद अहमदच्या हातात वॉल्थर पी88 पिस्तूल आढळले आहे. तर शूटर गुलामच्या हातात ब्रिटिश बुलडॉग रिवॉल्वर आढळली आहे. या दोन्ही पिस्तुलांविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
गॅंगस्टर अतिकची प्रयागराज कोर्टात हजेरी:वकिलासोबत हवी त्याला स्वतंत्र भेट, पोलिस मागणार रिमांड, त्यांच्याकडे 200 प्रश्नांची यादी
उमेश पाल हत्या प्रकरणात आरोपी गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ कोर्टात हजर झाला आहे. त्यांना एकाच व्हॅनमधून न्यायालयात आणण्यात आले. अतिक अहमद यांनी त्याच्या वकिलासोबत एकांतात भेटीची परवानगी मागितली आहे. दुसरीकडे, पोलिसांकडे 200 प्रश्नांची यादी आहे. त्यामुळे ते कोर्टात 14 दिवसांची कोठडीची मागणी करणार आहे. अलाहाबाद विद्यापीठातून अटक करण्यात आलेल्या सदाकत सोबत अतिकची देखील चौकशी पोलिसांना करायची आहे.