NHI/प्रतिनिधी
मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी रहेजा हॉस्पिटल विरुध्द सेव्हन हिल्स हॉस्पिटल यामध्ये १० एप्रिल रोजी शिवाजी पार्क मैदानात काटेरी टक्कर होईल. यामध्ये शेवटचा साखळी ब गट सामना असल्यामुळे हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार आहे. परिणामी रहेजा हॉस्पिटलचे कप्तान अविनाश डांगळे, अष्टपैलू संदीप पाटील, सत्कारमूर्ती चेतन सुर्वे, नितेश म्हस्के, सचिंद्र ठाकूर, मयूर भिवंडे आदींच्या खेळाविरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे कप्तान डॉ. हर्षद जाधव, अष्टपैलू डॉ. मनोज यादव, अष्टपैलू सुशांत गुरव, यष्टिरक्षक डॉ. इब्राहीम शेख, स्वप्नील शिंदे, विशाल सावंत आदींच्या खेळावर स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई अवलंबून राहील.
तत्पूर्वी माहीम ज्युवेनील खेळपट्टीवर साखळी अ गटात प्रथम स्थान पटकविण्यासाठी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुध्द ग्लोबल हॉस्पिटल यामध्ये लढत होईल. सामन्यातील विजयाची मदार ग्लोबल हॉस्पिटलचे सलामीवीर दयानंद पाटील, अष्टपैलू कपिल गमरे, निलेश देशमुख, आशिष जाधव, सुनील सकपाळ, विराज साळवी, महेश गोविलकर आदींच्या तर ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे कप्तान प्रदीप क्षीरसागर, अष्टपैलू रोहन महाडिक, शंतनू मोरे, प्रफुल मारू, मुत्तू इसाकी, सुथाकरण अब्राहम, सुनील बांदवलकर आदींच्या खेळावर असेल. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटपटू रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, केडीए हॉस्पिटलचे ओमकार पाटील, जसलोक हॉस्पिटलचे श्रीकांत दुधवडकर व जे.जे. हॉस्पिटलचे इक्बाल सय्यद यांचा विशेष गौरव १८ एप्रिल रोजी शिवाजी पार्क मैदानामध्ये करण्यात येणार आहे.
*******””””****”””********”””*****