मुंबई,: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे सह्याद्रीच्या कुशीत, हिरवीगार शेती, धबधब्यांच्या सानिध्यात मॉन्टेरियाच्या ‘काबिला’ व्हिलेजमध्ये पर्यटकांना उन्हाळी सुटीचा आनंद अधिक द्विगुणित करता येणार आहे. निरभ्र आकाश, नैसर्गिक वातावरणात भटकंती करण्याबरोबरच लोकांसोबत मिसळून आपला वेळ घालवायला आवडणाऱ्या व्यक्तींसाठी ‘मॉन्टेरिया व्हिलेज’ हे योग्य ‘पर्यटन डेस्टिनेशन’ ठरणार आहे. शहरात धकाधकीच्या आणि डिजिटल आयुष्यापासून दूर करून अशा व्यक्तींना सामाजिकरित्या व्यस्त ठेवण्यासाठी निसर्गसंपन्न ‘काबिला’ व्हिलेजची निर्मिती करण्यात आली आहे.
बंजारा समुदायापासून प्रेरणा घेत काबिला व्हिलेजमध्ये एकूण ४ श्रेणीत ४६ आरामदायी अशा विशिष्ठ थीमवर आधारित रूम्स आहेत. व्हिलेज हट्स (Village Huts), वूडन चॅलेट्स (Wooden Chalets-स्वित्झर्लंडमधील घरांच्या धर्तीवर बांधलेली लाकडी झोपडी), कच्छी भुंगाज (Kutchi Bhungas) आणि प्रीमियम कॉटेजेस आदी ४ श्रेणींचा या मध्ये समावेश असून, यामध्ये पर्यटकांना आधुनिक सुविधांसह सुंदर, पारंपरिक वास्तुकलेचा अनुभव घेता येणार आहे.