तापसी पन्नू हिने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला, तिने सिने क्षेत्रात 10 वर्षांचा अद्वितीय पल्ला ओलांडला. तापसीने चश्मे बद्दूर सिनेमाने अभिनयाची सुरुवात करून एक नवोदित ते आघाडीची अभिनेत्री म्हणून तिचा प्रवास थक्क करणारा आहे. तिची हटके अभिनय कौशल्ये आणि सिनेमांची निवड यामुळे सिनेक्षेत्रावर अमीट वर्चस्व निर्माण केले.
तिने ‘बेबी’मध्ये साकारलेल्या लक्षवेधी भूमिकेपासून ते पकड घेणाऱ्या कायदे नाट्य ‘पिंक’मधील विस्मरणीय मीनल अरोरा’पर्यंत आणि ‘मुल्क’मधील सशक्त आरती मोहम्मद, समाजातील समस्येवर आधारीत आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारण्यात तापसी कधीच घाबरली नाही, विचार-प्रवर्तक ‘थप्पड’ आणि इतर अनेक सिनेमांत तिच्या धैर्याची प्रचिती आली.
‘सांड की आंख’ या चरित्रात्मक सिनेमात तिने प्रकाशी तोमरची भूमिका साकारून उत्कृष्ट अभिनय वठवला. त्याचप्रमाणे ‘हसीन दिलरुबा’ मधील राणी कश्यप’च्या आकर्षक भूमिकेने तिच्या अफाट प्रतिभेला अधिक ठळक केले. ‘मनमर्जियां’ या रोमँटिक नाटकातील प्रतिभावान विकी कौशलसोबतची तिची जमून आलेली केमिस्ट्री कोण बरं विसरू शकेल, तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
तिचे अलिकडचे सिनेमे म्हणजे ‘शाबाश मिथु’, ‘लूप लपेटा’, आणि ‘ब्लर’ सारख्या चित्रपटांमधील अपवादात्मक अभिनय कौशल्यासाठी सार्वत्रिक प्रशंसा मिळाली आहे. शाहरुख खानच्या विरुद्ध ‘डंकी’ आणि यंदा ‘फिर आयी हसीन दिलरुबा’मधील भूमिकेची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
अडथळे आणि अडचणींचा सामना करूनही, तापसीने कठोर परिश्रम आणि प्रतिभेने सिनेक्षेत्रात स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. या क्षेत्राबाहेरील तिऱ्हाईत म्हणून, तिने इतरांसाठी पाऊलखूणा उमटवल्या आहेत, असंख्य व्यक्तींना स्वत:च्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि कधीही हार न मानण्याची प्रेरणा दिली आहे.
प्रतिष्ठित ब्रँडचा चेहरा होण्यापासून ते चित्रपटांच्या निर्मितीपर्यंत, तापसीची स्टार पॉवर आणि प्रभाव झपाट्याने वाढत आहेत. ती खरी ट्रेलब्लेझर, आशेचा किरण आणि अनेकांसाठी आदर्श आहे. तिचे बॉलिवूडमध्ये आणखी एक दशक सुरू झाले असून, तापसी पन्नू चमकत राहील यात शंका नाही!