भारतीय 9 भाषांसह सर्व 10 भाषांमधील ट्रेलर नुकताच प्रसिद्ध
मराठी ट्रेलर लिंक: https://www.youtube.com/watch?v=3bNnlClSto4
भारतात सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच, बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय हॉलीवूड फ्रेँचायझी फिल्म विविध 10 भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होते आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर स्पायडर-मॅन पटांनी कायमच अभूतपूर्व यश कमावले असून स्पायडर-मॅन हा आपल्या देशाचा सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो राहिला आहे. लहान-थोरांना, सर्वांनाच हा सुपरहिरो आपलासा वाटतो. देशात स्पायडर-मॅनचा चाहता वर्ग अफाट असून त्याची भुरळ सर्वांना झपाटून टाकते. हाच धागा साधून निर्मात्यांनी स्पायडर-मॅनला सर्व भारतीयांच्या अधिक जवळ आणण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे, ज्यामुळे ही एक पॅन-इंडिया फिल्म झाली असून 2023 मधील सर्वाधिक पसंतीची कलाकृती बनली आहे.
इंग्रजीशिवाय, ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ ही फिल्म हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषांत प्रदर्शित होणार आहे. 10 भाषांमध्ये एखादा सिनेमा प्रदर्शित होणे मुळात हाच एक मापदंड असून त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाचा अनुभव अनेक भाषांमध्ये, तो देखील स्वत:च्या आवडीनुसार करता येईल.
सोनी पिक्चर्स रिलीझिंग इंटरनॅशनल (एसपीआरआय), इंडिया’चे महाव्यवस्थापक आणि प्रमुख शोनी पंजीकरण सांगतात, ” स्पायडर-मॅन हा भारतातील सर्वांच्या पसंतीचा सुपर-हिरो आहे, आणि कोणताही स्पायडर-मॅन सिनेमा म्हणजे संपूर्ण भारतातील खरी आणि वास्तविक घटना आहे. ‘नो वे होम’ या शेवटच्या स्पायडर-मॅन सिनेमाने स्पायडर-मॅनला प्रेक्षकांकडून मिळालेल्या पसंतीत आणखीन भर घातली. प्रदेश आणि भाषांमधील कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे, भारतातील प्रत्येक घराने त्यांच्या स्वतःची भाषेत आवडत्या सुपरहिरोचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा होती. 10 भाषांमध्ये ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ रिलीज केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारताला स्पायडर-मॅन आवडतो आणि पवित्र प्रभाकर या भारतीय स्पायडर-सह अनेक भारतीय घटकांची ओळख करून देणारा हा आमच्यासाठी अधिक खास आहे. देशभरातील प्रेक्षक या चित्रपटावर प्रेम कर तील याची खात्री मला वाटते.”
माइल्स मोरालेस ऑस्कर®-विजेत्या स्पायडर-व्हर्स गाथा, स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्सच्या पुढील अध्यायासाठी परतले. ग्वेन स्टेसी समवेत पुन्हा एकत्र आल्यानंतर, ब्रुकलिनचा पूर्ण-वेळ, मैत्रीपूर्ण शेजार यांच्यासह स्पायडर-मॅन मल्टीव्हर्समध्ये पोहोचला आहे, जिथे तो स्पायडर-पीपलच्या एका संघाला भेटतो. जिथे त्याच्या अस्तित्वाचं रक्षण करण्याचा आरोप ठेवण्यात येतो. या चित्रपटाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरची पहिल्यांदाच थेट ओळख मुंबॅटनच्या रस्त्यावर होते.
आता आम्हाला प्रचंड आवडणाऱ्या या जाळं विणणाऱ्या सुपरहिरोला भेटण्याची आतुरता आहे, कारण तो सगळ्याच भाषांमधून आपल्या भेटीला येतो आहे!
सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया निर्मित ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ 2 जून 2023 पासून इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होतो आहे. फक्त सिनेमागृहांमध्ये.