- 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये व्हिसा अर्जांचे प्रमाण दुपटीने वाढले
- आपल्या दारात व्हिसा सारख्या वैयक्तिकृत सेवांसाठी निरोगी वाढ
मुंबई, 30, मार्च 2023: वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय सीमा उघडणे आणि कोविडशी संबंधित प्रोटोकॉल शिथिल केल्यामुळे 2022 मध्ये मुंबईतील व्हिसा अर्ज महामारी पूर्वीच्या पातळीच्या जवळ पोहोचले. व्ही.एफ.एस ग्लोबलच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये मुंबईतून व्हिसा अर्जांचे प्रमाण 73% पर्यंत पोहोचले आणि 2021 च्या तुलनेत 177% वाढ नोंदविली गेली.
“आम्हाला 2022 मध्ये भारतातून अभूतपूर्व मागणी होती ज्यामुळे डिसेंबरपर्यंत स्थिर व्हॉल्यूमसह वाढलेला आउटबाउंड ट्रॅव्हल सीझन अनुभवायला मिळाला. आम्हाला विश्वास आहे की ही गती आणखी वाढेल आणि म्हणूनच अर्जदारांनी शेवटच्या क्षणी होणारे हिरमोड टाळण्यासाठी व्हिसासाठी आगाऊ अर्ज करणे योग्य आहे,” असे व्ही.एफ.एस ग्लोबलचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (दक्षिण आशिया) प्रबुद्ध सेन यांनी सांगितले.
प्रवाशांच्या वर्तणुकीत आणखी एक लक्षणीय कल दिसून आला तो म्हणजे महामारीपासून सुरू झालेल्या वैयक्तिक सेवेचा व्यापक स्वीकार करणे. व्हिसा अॅट युअर डोअरस्टेप (व्ही.ए.वाय.डी) सारख्या प्रीमियम वैकल्पिक सेवांमध्ये 2022 मध्ये 2.5 पट वाढ झाली आहे. व्ही.एफ.एस ग्लोबल भारतातील ग्राहक असलेल्या 16 सरकारांसाठी व्ही.ए.वाय.डी ऑफर करते- ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, आइसलँड, इटली, लॅटव्हिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड, यू.के.
‘नवीन प्रथेप्रमाणे आरोग्याचा विचार हा महत्त्वाचा घटक आहे. परिणामी, विनाअडथळा व्हिसा अनुभव देणाऱ्या आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देणाऱ्या अशा सेवांचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे सेन यांनी सांगितले.
पीक सीझन ट्रॅव्हल गाईड
#ApplyinAdvance
विमानांचे आणि मुक्कामाचे बुकिंग करण्यापूर्वीच व्हिसासाठी अर्ज करण्याची शिफारस केली जाते. बहुतेक देश आपल्या प्रवासाच्या तारखेच्या 90 दिवस (3 महिने) आधी व्हिसा अर्ज स्वीकारतात. सुधारित शेन्गेन व्हिसा कोडनुसार, 09 फेब्रुवारी 2020 पासून, आपण आपल्या प्रवासाच्या तारखेच्या 6 महिन्यांपूर्वी शेन्गेन व्हिसासाठी अर्ज करू शकता. विशेषत: यावर्षी जास्त मागणी आणि मर्यादित अपॉइंटमेंट स्लॉट उपलब्ध असल्याने आम्ही अर्जदारांना शक्य तितक्या लवकर व्हिसासाठी अर्ज करण्याचे आवाहन करतो.
#DoNotFallForFraud
व्हिसा अर्जदारांना व्ही.एफ.एस ग्लोबलचे नाव वापरून किंवा स्वतंत्रपणे अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी किंवा इतर कोणतीही सेवा प्रदान करण्यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारणाऱ्या फसव्या संस्थांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. अपॉइंटमेंटचे वेळापत्रक ठरवण्यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारत नाही. कोणत्याही मदतीसाठी, आमच्या कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याशी संपर्क साधा किंवा communications@vfsglobal.com वर ईमेल पाठवा.
सिमलेस व्हिसा अनुभवासाठी आमच्या वैकल्पिक मूल्यवर्धित सेवांचा आनंद घ्या जसे की:
- प्रीमियम लाउंज: जलद, सुरक्षित, आरामदायक- वैयक्तिकृत व्हिसा सादर करण्याचा अनुभव मिळवा.
- फॉर्म भरण्यासाठी मदत: आमचे तज्ञ कर्मचारी फोनवर किंवा व्हिसा अर्ज केंद्रावर आपला व्हिसा अर्ज पूर्ण करण्यासाठी आपली मदत करू शकतात
- कुरिअर सेवा: आम्ही आपला पासपोर्ट आणि कागदपत्रे वितरित करतो. हे जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर आहे.
- ट्रॅव्हल मेडिकल इन्शुरन्स: जागतिक विमा कंपन्यांकडून कोविड-19 कव्हरेजसह आपला अनिवार्य ट्रॅव्हल मेडिकल इन्शुरन्स मिळवा.
- एस.एम.एस अलर्ट: आपल्या व्हिसा अर्जाच्या प्रगतीबद्दल अपडेटेड रहा.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://www.vfsglobal.com/en/individuals/solutions.html