मुंबई : मुंबईतील प्रसिद्धी माध्यमे, बॉलीवूडशी संबंधित व्यक्ती, कामगार, त्यांचे कुटुंबीय आणि मुंबई पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य महाआरोग्य शिबिराचा हजारोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी लाभ घेतला.
आरके एचआयव्ही एड्स रिसर्च अँड केअर सेंटरचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र कुमार, मनीष वर्मा, क्रिएटिव्ह आय लिमिटेडचे निर्माता-दिग्दर्शक धीरज कुमार आणि प्रमुख पाहुणे शिवाजी राव सावंत यांनी मुंबईतील चित्रकूट मैदानात या महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. चित्रपट इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भव्य महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जॉर्जियाचे कौन्सिल जनरल सतेंद्र पाल सिंह आहूजा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या शिबिरासाठी गेले तीन महिने आपल्या टीमने मेहनत घेतल्याचे सांगत शिबीर यशस्वी होण्यासाठी कार्यरत असलेल्या शिवाजीराव सावंत यांचेही डॉ. धर्मेंद्र कुमार यांनी आभार मानले. आरोग्य तपासणी, अस्थिरोग, ईसीजी टेस्ट, नेत्र तपासणी, हृदय तपासणी, दंत तपासणी, रक्त तपासणी अशा सुविधा आणि हजारो चष्मे, व्हील चेअर यांचे वाटप शिबिरात करण्यात आले. १४ जानेवारी २०२४ ला असेच महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती धीरज कुमार यांनी दिली.