प्रतिनिधी/NHI
मुंबई : क्रिफ हाय मार्कने आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२३ वर डेटा जारी केला, जो अलिकडील काळामध्ये भारतीय महिला कर्जदारांच्या कर्ज घेण्यामध्ये झालेल्या वाढीला निदर्शनास आणतो.
रिटेल कर्जाची कामगिरी:
डेटानुसार महिला कर्जदारांच्या रिटेल कर्जांच्या पोर्टफोलिओची थकबाकी डिसेंबर २०२२ पर्यंत २६ लाख कोटी रूपये आहे, ज्यामध्ये डिसेंबर २०२१ पर्यंतच्या २०.७ लाख कोटी रूपयांच्या तुलनेत वार्षिक २५ टक्क्यांची वाढ झाली. एकूण रिटेल कर्जांमध्ये (मूल्यानुसार) महिला कर्जदारांचा शेअर डिसेंबर २०२१ पर्यंत २५.३ टक्क्यांवरून डिसेंबर २०२२ पर्यंत २६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
भारतातील महिला कर्जदारांनी लाभ घेतलेल्या प्रमुख रिटेल कर्ज उत्पादनांमध्ये सुवर्ण कर्ज (४२ टक्के शेअर), शैक्षणिक कर्ज (३५ टक्के), गृह कर्ज (३२ टक्के) आणि मालमत्तेवर कर्ज (२९ टक्के) यामध्ये डिसेंबर २०२२ पर्यंत इतर उत्पादनांच्या तुलनेत महिला कर्जदारांचा (पोर्टफोलिओ थकबाकीनुसार) सर्वोच्च शेअर आहे.
प्रमुख रिटेल कर्ज उत्पादनांमध्ये सरासरी तिकिट आकार (लाख रूपयांमध्ये):
महिला कर्जदारांसाठी कॅलेंडर वर्ष २०२० ते कॅलेंडर २०२२ पर्यंत वैयक्तिक कर्ज व कंझ्युमर ड्युरेबल लोन्स याव्यतिरिक्त सर्व प्रमुख रिटेल कर्ज उत्पादनांसाठी सरासरी तिकिट आकार (एटीएस) वाढला आहे.
महिला कर्जदारांसाठी वैयक्तिक कर्जांचा एटीएस कॅलेंडर वर्ष २०२० ते कॅलेंडर वर्ष २०२२ पर्यंत १७ टक्क्यांनी कमी झाला आहे, तर याच कालावधीत पुरूष कर्जदारांसाठी ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. कंझ्युमर ड्युरेबल लोन्ससाठी एटीएस स्थिर आहे.
कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये ऑटो कर्ज, सुवर्ण कर्ज व वैयक्तिक कर्ज यांचा सरासरी तिकिट आकार (एटीएस) पुरूष कर्जदारांच्या तुलनेत महिला कर्जदारांसाठी सर्वोच्च आहे. कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये पुरूष व महिला कर्जदारांसाठी दुचाकी कर्ज व कंझ्युमर ड्युरेबल लोन्सचा एटीएस समान आहे.
प्रमुख रिटेल कर्ज उत्पादनांमध्ये महिला कर्जदारांसाठी अव्वल ५ राज्ये:
डिसेंबर २०२२ पर्यंत महाराष्ट्र गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, मालमत्तेवर कर्ज, ऑटो कर्ज व कंझ्युमर ड्युरेबल लोन्स यांचा लाभ घेणाऱ्या महिला कर्जदारांसाठी सर्वोच्च कर्ज कामगिरी करणारे अव्वल राज्य आहे. तामिळनाडू वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज, शैक्षणिक कर्ज व दुचाकी कर्ज यांचा लाभ घेणाऱ्या महिला कर्जदारांसाठी अव्वल राज्य आहे.
कोविड-पूर्व, कोविडदरम्यान व कोविडनंतरच्या काळामध्ये महिला कर्जदारांसाठी ओरिजिनेशन्स:
महिला कर्जदारांनी लाभ घेतलेल्या प्रमुख रिटेल कर्ज उत्पादनांमध्ये सुवर्ण कर्ज, गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज या कर्जांनी आर्थिक वर्ष २०२० ते आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत ओरिजिनेशन्स मूल्यामध्ये सर्वोच्च वाढ नोंदवली. आकारमानानुसार कृषी+ट्रॅक्टर कर्ज, ऑटो कर्ज व दुचाकी कर्ज वगळता महिला कर्जदारांनी लाभ घेतलेल्या सर्व प्रमुख कर्ज उत्पादनांनी आर्थिक वर्ष २०२० ते आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत वाढ नोंदवली.
वयोमानानुसार महिला कर्जदारांसाठी ओरिजिनेशन्स (प्रमुख रिटेल कर्ज उत्पादने):
३५ वर्षे व त्याहून कमी वयोगटातील महिला कर्जदारांचा ओरिजिनेशन्स शेअर कॅलेंडर वर्ष २०२० मधील ३८.३ टक्क्यांवरून कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये ४३.४ टक्क्यांपर्यंत वाढला, तर ३६ ते ५० वर्षे वयोगटातील महिला कर्जदारांचा ओरिजिनेशन्स शेअर कॅलेंडर वर्ष २०२० मधील ४३.५ टक्क्यांवरून कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये ४१.२ टक्क्यांपर्यंत घसरला.
महिला कर्जदारांसाठी न्यू टू क्रेडिट (एनटीसी) ओरिजिनेशन्स (प्रमुख रिटेल कर्ज उत्पादने):
महिला कर्जदारांमध्ये न्यू टू क्रेडिट ओरिजिनेशन्स आकारमानाचा शेअर कॅलेंडर वर्ष २०२० मधील २९.२ टक्क्यांवरून कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये ३९.५ टक्क्यांपर्यंत वाढला.