४१ मजली आधुनिक आश्चर्य, शहराचे रूप पालटण्यासाठी आणि तुम्हाला चकित करण्यासाठी सज्ज आहे
मुंबई, भारत: प्रतीक्षा संपली आणि आला अभिमानाचा क्षण! ‘द अल्टीट्यूड’च्या शुभारंभाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पारंपरिक डिझाईनच्या चौकटीपलीकडे जाणारा आणि मुंबईतील लक्झरी जीवनशैलीचे नवे मापदंड रचणारा, परिवर्तनकारी, गगनचुंबी निवासी प्रकल्प आम्ही सादर करत आहोत. या क्षेत्रातील कामाचा गेल्या चार दशकांचा सखोल अनुभव गाठीशी असलेले, निपुण आर्किटेक्ट आणि डिझायनर श्री. भालचंद्र वळंजू यांच्या नेतृत्वाखाली नामांकित व्हीडीव्ही डेव्हलपर्सने हा प्रकल्प विकसित केला आहे.
मॅनहॅटन स्टाईल अपार्टमेंट्सचा प्रकल्प अतिशय अनोखा असून, इतरत्र सहसा आढळून न येणाऱ्या ऑफरिंग्स आणि अत्याधुनिक सुविधा देऊन या प्रकल्पाने लक्झरी जीवनशैलीची नवी व्याख्या रचली आहे. हँगिंग इन्फिनिटी पूल, अत्याधुनिक फिटनेस सेंटर आणि मुंबई स्कायलाईनचे नयनरम्य दृश्य यांचा लाभ येथील रहिवाशांना मिळणार आहे. ४१ मजली प्रकल्पामध्ये परिपूर्ण लक्झरी प्रदान करण्यात आली आहे, ‘द अल्टीट्यूड’मध्ये जमीन ते सीलिंग उंची १४ फीट आहे, ताडदेवमध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेला हा प्रकल्प शानदार व परिपूर्ण जीवनशैलीचा पुरेपूर अनुभव मिळवून देतो. अशाप्रकारचे प्रकल्प मुंबईत खूपच दुर्मिळ असल्याने, ‘द अल्टीट्यूड’ हा खऱ्या अर्थाने अनोखा व एक्सक्लुसिव्ह प्रकल्प आहे.
श्री. भालचंद्र वळंजू यांनी सांगितले, “लक्झरी, सुविधा आणि मोक्याचे ठिकाण यांचा उत्तम मिलाप असलेले ‘द अल्टीट्यूड’ ही मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेतील एक अनोखी संकल्पना आहे. दर्जेदार बांधकाम, क्रांतिकारी आर्किटेक्चरल डिझाईन आणि प्रत्येक तपशीलाकडे बारकाईने लक्ष देण्यावर भर देत आमच्या रहिवाशांना जागतिक दर्जाचा जीवनशैली अनुभव प्रदान करणे हा आमचा उद्देश आहे.”
ब्लॉक्सचे संस्थापक व सीईओ श्री. आदित्य झवेरी यांनी सांगितले, “या दूरदर्शी प्रकल्पामध्ये श्री. भालचंद्र वळंजू यांच्यासोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना ऑनलाईन घरखरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करण्यासाठी ब्लॉक्स बांधील आहे आणि द अल्टीट्यूड हे त्याच दिशेने उचलण्यात आलेले महत्त्वाचे पाऊल आहे. व्हीडीव्ही डेव्हलपर्सच्या सहयोगाने द अल्टीट्यूडमध्ये तयार करण्यात आलेले डिजिटल एक्स्पेरिएन्शियल सेंटर या प्रकल्पातील शानदार सुविधा, क्रांतिकारी डिझाईन आणि मोक्याचे ठिकाण हे लाभ दर्शवेल, त्यामुळे संभावित घर खरेदीदारांना त्यांचे स्वप्नातील घर शोधणे सोपे जाईल.”
‘द अल्टीट्यूड’ हा काही फक्त निवासी प्रकल्प नाही, तर रिअल इस्टेट उद्योगक्षेत्रातील परिवर्तनाचे पहिले पाऊल आहे. ताडदेवच्या मुकुटातील शिरोमणी बनण्यासाठी सज्ज असलेला हा प्रकल्प मुंबई महानगराच्या मध्यभागी आधुनिक व कॉस्मोपॉलिटन जीवनशैली प्रदान करतो. आजवर कधीही पाहिला न गेलेला डिझाईनविषयीचा क्रांतिकारी दृष्टिकोन दर्शवणारा हा प्रकल्प, मुंबईमध्ये अपस्केल निवासी विकासकामाचे नवे मानक स्थापित करत आहे.