MUMBAI/NHI
शिवाजी पार्क जिमखानातर्फे झालेली टेनिस संघटक पी.एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती एसपीजी दुहेरी टेनिस स्पर्धा भावेश नवलु-विजय गिरी जोडीने जिंकली. भावेश नवलु-विजय गिरी जोडीने मंगेश इनामे-अक्षय इनामे जोडीचा ५ गुणांच्या फरकाने पराभव करून विजेतेपदाला सहज गवसणी घातली. दादर-पश्चिम येथील एसपीजी टेनिस कोर्टवर ‘सेक्युरिटी एचक्यू’ कंपनी पुरस्कृत स्पर्धेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्यासाठी मर्यादित असलेली सातवी दादा खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धा शिवाजी पार्क जिमखान्यात संपन्न झाली. यंदा मुंबई शहर व उपनगरसह ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अहमदाबाद, बडोदा, हैद्राबाद आदी जिल्ह्यातील २७० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामधील अंतिम फेरीत भावेश नवलु व विजय गिरी जोडीने प्रथमपासून सर्वांगसुंदर खेळ करून मंगेश इनामे व अक्षय इनामे जोडीवर ६-१ अशी सहज मात केली. मंगेश-अक्षय इनामे जोडीला सूर न सापडल्यामुळे अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण रु.८०,०००/- रक्कमेचे पुरस्कार एसपीजीचे जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर, असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन, टेनिस सेक्रेटरी योगेश परुळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.