यामध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण परब यांच्या प्रमुख भूमिका असतील. ट्रेलर जाहीर झाला आहे.
लिंक: http://bit.ly/SchoolCollegeAniLifeTrailer
विहान सूर्यवंशी दिग्दर्शित ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ या मराठी चित्रपटाचे निर्माता ब्लॉकबस्टर दिग्दर्शक रोहित शेट्टी हे आहेत.
सर्वांचे आवडते तेजस्वी प्रकाश, करण परब हे मुख्य भूमिकेत आहेत. ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ हा दैनंदिन जीवनावर आधारित एक कौटुंबिक एंटरटेनर आहे. ट्रेलरमध्ये एका तरुणाच्या शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात येणारी आव्हाने आणि आनंदाची झलक बघायला मिळते.
रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने रोहित शेट्टी, पवित्रा गांधी आणि विवेक शाह द्वारे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. हा एंटरटेनर 14 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.