नवे, 100 सीसी ओबीडी2 चे पालन करणारे, ईएसपी (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर) पॉवर्ड इंजिन
१२ नव्या पेटंट अर्जांसह नाविन्यतेच्या बाबतीत बाजारपेठेत आघाडीवर
ग्राहकांसाठी नवे मूल्य देणारे पॅकेज
सहा वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज
शाइन 100 आता ५ रंगांत उपलब्ध
आकर्षक किंमत रू. ६४,९०० (एक्स शोरूम मुंबई)
NHI/मुंबई, 2023
– वाहन क्षेत्राला नवे परिमाण देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज शाइन – 100 ही त्यांची सर्वात वाजवी आणि इंधनाच्या बाबतीत कार्यक्षम मास मोटरसायकल लाँच केली.
100 सीसीच्या बेसिक मास कम्युटर (दैनंदिन प्रवासी) विभागात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेला होंडाचा ब्रँड शाइनने यापूर्वी १२५ सीसी मोटरसायकल विभागात ग्राहकांना विसंबून राहाण्याची क्षमता, विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वर्चस्व तयार केले आहे. अधिक विश्वासार्हता देण्यासाठी शाइन 100 ही गाडी १२ नव्या पेटंट अर्जांसह तयार करण्यात आली आहे.
नवी शाइन 100 लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘शाइन हा या विभागातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासू मोटरसायकल ब्रँड आहे. आज आम्ही होंडाची नवी 100 सीसी मोटरसायकल- शाइन 100 चे अनावरण करत आहोत, जी शाइनचा वारसा पुढे नेण्याच्या हेतूने तयार करण्यात आली आहे. भारतातील लोकांचा दैनंदिन प्रवास सोपा आणि वाजवी करण्यासाठी शाइन 100 हे होंडाने टाकलेले पुढचे मोठे पाऊल आहे. शाइन 100 लाँच करताना आम्ही देशभरातील ग्राहकांच्या आकांक्षा आणि सर्वोच्च गुणवत्ता मिळवण्याचा ध्यास पूर्णपणे विचारात घेतला आहे.’
शाइन 100 च्या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘आज भारतीय ग्राहकांसाठी नवी १०० सीसी मोटरसायकल शाइन 100 च्या लाँचच्या निमित्ताने एका नव्या प्रवासाची सुरुवात होत आहे. शाइन 100 च्या रूपाने होंडा प्रत्येक भारतीय ग्राहकाला त्यांच्या अपेक्षांच्या पलीकडे जाणारे असामान्य उत्पादन उपलब्ध करून देत आहे. गाडीची विसंबून राहाण्यासारखी कामगिरी, आरामदायी प्रवास आणि वाजवी किंमत यांच्या मदतीने आम्ही लोकांना आयुष्यात पुढे जाण्याचे, नवे क्षितिज शोधण्याचे आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य बहाल करत आहोत. अधिक चांगल्या भविष्यासाठी आपण सगळे एकत्र पुढे जाऊया.’
नवे 100 सीसी इंजिन
शाइन 100 मध्ये नवे १०० सीसी ओबीडी2 पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन बसवलेले आहे, ज्याला एनहान्स्ड स्मार्ट पॉवरची (ईएसपी) जोड देण्यात आली आहे. त्यामुळे कंबशन प्रभावीपणे वाढून उर्जाही वाढते आणि याचे पर्यावरणपूरक इंजिन घर्षण कमी करते. नवे १०० सीसी इंजिन वजनास हलके आणि कार्यक्षम असून नाविन्यपूर्ण निर्मितीमुळे त्याची कामगिरी, वाट काढण्याची क्षमता अधिक चांगली झाली आहे. या इंजिनमुळे या श्रेणीतील सर्वाधिक मायलेज आणि पर्यायाने चांगले मूल्य ग्राहकांना मिळते. इंधनाच्या टाकीवर बसवण्यात आलेल्या बाह्य फ्युएल पंपमुळे देखभालीचा वेळ कमी होतो, कारण ते सहजपणे हाताळणे शक्य होते.
1. प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय) – ही यंत्रणा ऑनबोर्ड सेन्सर्सच्या मदतीने सातत्याने इंधन आणि हवेचे मिश्रण भरते, ज्यामुळे एकसलग उर्जा, चांगली इंधन क्षमता मिळते व कमी उत्सर्जन होते.
2. घर्षण कमी होते: पिस्टन कूलिंग जेटमुळे घर्षण कमी होते व इंजिनचे तापमान योग्य राखले जाते. ऑफसेट सिलेंडर आणि रॉकर रोलर आर्मच्या वापरामुळे घर्षणातून होणारे नुकसान कमी होते. यामुळे जास्त चांगली व एकसलग उर्जा मिळते, शिवाय इंधन कार्यक्षमता उंचावते.
3. सोलेनॉइड व्हॉल्व्ह – स्वयंचलित चोक सिस्टीमुळे हवेचे मिश्रण दर्जेदार राहाते आणि कोणत्याही वेळेस एकाच प्रयत्नात स्टार्ट करणे शक्य होते.
उच्च दर्जाचा आरामदायीपणा आणि सोयीस्करपणा
लांब आणि आरामदायी सीटमुळे (६७७ मिमी) रायडरला तसेच पिलियनला भरपूर जागा मिळते व दूरवरचा प्रवास आरामदायी होतो. कुटुंबासाठी किंवा कामासाठीचा प्रवास असला, तरी शाइन 100 ची बसण्याची स्थिती चांगला आरामदायीपणा देते व दैनंदिन प्रवासाचा थकवा कमी करते. शाइन 100 चा अनोख्या पद्धतीने डिझाइन करण्यात आलेला टँक आणि अरूंद लेग ओपनिंग अँगल यांमुळे रायडरला चांगली पकड घेता येते.
रायडिंगची स्थिती डिझाइन करताना कुटुंबासाठीचे आरामदायी रायडिंग तसेच सामान नेण्याच्या गरजेचाही विचार करण्यात आला आहे. ऑप्टिमम सीट हाइटमुळे (७८६ मिमी) सरासरी उंचीच्या भारतीय रायडर्सना सहजपणे पाय टेकवता येतात. लाँग स्ट्रोकसह खास तयार करण्यात आलेल्या सस्पेन्शन युनिटमुळे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर सहजपणे प्रवास करता येतो. खडबडीत पृष्ठभागावर कंपने जिरवण्याच्या याच्या क्षमतेमुळे रायडर तसेच पिलियनला जास्त स्थिरता आणि आत्मविश्वास मिळतो.
इंजिन इनहॅबिटरसह देण्यात आलेल्या साइड स्टँडमुळे साइड स्टँड लावलेला असताना इंजिन सुरू होत नाही व पर्यायाने काळजीमुक्त प्रवास करता येतो. शाइन 100 ची प्रत्येक सफर आरामदायी आणि सोयीस्कर करण्यासाठी त्यात कॉम्बी-ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझरसह देण्यात आली आहे.
जास्त उपयुक्ता
हलक्या वजनाच्या टिकाऊ स्टील फ्रेममुळे खालच्या वाहनाच्या एकंदर वजनात भर घातली जाते. यामुळे सॉफ्ट स्टीयरिंगचा फील येतो व सहजपणे वाट काढणे शक्य होते. टिकाऊ आणि टणक फ्रेम वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर सोयीस्कर असून सामान वाहून नेण्यास उपयुक्त आहे. १.९ मीटर्सच्या लहान टर्निंग रेडियसमुळे अरूंद रस्त्यावर वाहन हाताळणे शक्य होते. दर्जेदार ग्रेडेबिलिटीमुळे शाइन १०० भरपूर सामान असतानाही सहजपणे वर चढू शकते. लांबलचक व्हीलबेस (१२४५ मिमी) आणि हाय ग्राउंड क्लियरन्स (१६८ मिमी) यामुळे जास्त वेग तसेच खराब रस्ता असतानाही गाडी स्थिर राहाते व रायडरचा आत्मविश्वास कायम राहातो.
अभिजात स्टाइल
भारताच्या आवडत्या शाइन 125 पासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेली शाइन 100 ची एकंदर ग्राफिक थीम मोटरसायकलच्या अभिजाततेमध्ये भर घालते. आकर्षक फ्रंट काउल, पूर्ण काळ्या रंगाचे अलॉय व्हील्स, प्रॅक्टिकल अल्युमिनिम ग्रॅब रेल, बोल्ड टेल लॅम्प व स्लीक डिस्टिंग्विश्ड मफलर यामुळे मोटरसायकलची स्टाइल उठावदार झाली आहे.
महत्त्वाची विश्वासर्हता
एचएमएसआयद्वारे शाइन 100 वर खास सहा वर्षांचे वॉरंटी पॅकेज (३ वर्ष स्टँडर्ड + 3 वर्षांची पर्यायी विस्तृत वॉरंटी) देण्यात आली आहे.
किंमत आणि रंगाचे पर्याय
शाइन 100 बाजारपेठेत ५ रंगात (ब्लॅक विथ रेड स्ट्राइप्स, ब्लॅक विथ ब्लू स्ट्राइप्स, ब्लॅक विथ ग्रीन स्ट्राइप्स, ब्लॅक विथ गोल्ड स्ट्राइप्स, ब्लॅक विथ ग्रे स्ट्राइप्स) उपलब्ध करण्यात आली असून तिची किंमत रू. रू. ६४,९०० (एक्स शोरूम मुंबई) ठेवण्यात आली आहे.