प्रतिनिधी/NHI/भास्कर कोर्लेकर
गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित “ नियम व अटी लागू” या खुसखुशीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार १८ मार्च रोजी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होत आहे.
या नाटकात नियम व अटींची कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ पाहायला मिळणार आहे.यात लेखक व अभिनेता अशी दुहेरी भूमिका संकर्षण क-हाडे पार पाडत असून सोबत अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या तिघांची केमिस्ट्री पाहताना धम्माल येणार आहे.नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आहेत.