लॉस एंजेलिस NHI
चित्रपटसृष्टीतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 95 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या सोहळा भारतासाठी खूप खास ठरला. ऑस्कर 2023 साठी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला आहे. भारताला पहिल्यांदाच नाटू नाटूमुळे या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. या सोहळ्यात अनेक संस्मरणीय क्षण पाहायला मिळाले. नाटू नाटूला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक झालेली दिसली. तिचे डोळे पाणावले होते. तर आरआरआरचे दिग्दर्शक राजामौली थिएटरमध्ये सर्वात मागे बसलेले दिसले.
द एलिफंट व्हिस्पर्स हा सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट ठरला. तर ऑल दॅट ब्रीथ्स ही डॉक्युमेंटरी फीचर फिल्म या शर्यतीतून बाहेर पडली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला या तीन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते.
आता पाहा ऑस्कर सोहळ्यातील टॉप मोमेंट्स…
संगीतकार एमएम किरवानी यांनी ऑस्कर जिंकल्यानंतर गाऊन आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले- आरआरआरनेच ऑस्करवर आपली मोहोर उमटवावी अशी प्रत्येक भारतीय प्रार्थना करत होता.
नाटू-नाटू गाण्यावरील लाइव्ह परफॉर्मन्सला थिएटरमध्ये उपस्थित लोकांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले. तर RRR चे दिग्दर्शक राजामौली आणि त्यांचे कुटुंब सर्वात मागे बसलेले दिसले.
परफॉर्मन्ससाठी डॉल्बी थिएटरमध्ये यूक्रेनच्या पॅलेसचा सीन क्रिएट करण्यात आला होता. मूळ चित्रपटात हे गाणे रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी 2022 मध्ये शूट करण्यात आले होते.
पुरस्कार सोहळा सुरू होण्यापूर्वी दीपिका पदुकोणने रामचरण तेजासोबत फोटोशूट केले. आरआरआरच्या गाण्याच्या परफॉर्मन्ससाठी दीपिका येथे प्रेझेंटर म्हणून उपस्थित होती.
लॉस एंजेलिसमधील ऑस्कर सोहळ्यात RRR चे लीड स्टार कास्ट रामचरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर देखील उपस्थित होते, परंतु दोघांनीही स्टेज परफॉर्मन्स दिला नाही.
गुनीत मोंगा निर्मित द एलिफंट व्हिस्पर्सने सर्वोत्कृष्ट लघु माहितीपटाचा ऑस्कर जिंकला. याआधी 2019 मध्ये त्यांच्या ‘पीरियड एंड ऑफ सेन्टेन्स’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी ऑस्कर जिंकला आहे.
ऑस्कर होस्ट जिमी किमेलने प्रथम पॅराशूट स्टेजवर पोहोचले, त्यानंतर त्यांनी एक गाढव स्टेजवर आणले. हे गाढव बंशीज द इंशरिनचे प्रतिनिधित्व करत होते.
कोकीन बियर या हॉरर कॉमेडीचे दिग्दर्शन करणाऱ्या एलिझाबेथ बँक्स यांनी व्हिज्युअल इफेक्ट्स विजेत्याची घोषणा करण्यासाठी स्टेजवर अस्वल आणले होते. हे अस्वल एक डमी होता.