अहमदाबाद : भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने आता फक्त एक विक्रम रचलेला नाही तर एक इतिहास त्याने घडवला आहे. आतापर्यंत एकाही खेळाडूला अश्विनसारखी कामगिरी अजूनपर्यंत करता आलेली नाही.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा सामना अनिर्णीत राहिला. पण मालिका मात्र भारताने जिंकली. या मालिका विजयानंतर आता अश्विनची चर्चा जगभरात सुरु झाली आहे. कारण या मालिकेत अश्विनने नेनेत्रदीपक कामगिरी केली. त्यामुळे आता जगभरात अश्विनचा डंका वाजला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या या मालिकेत सर्वाधिक विकेट्स अश्विनने मिळवल्या आणि त्याचबरोबर अश्विनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
अश्विनने मालिकेत सर्वाधिक विकेट्स काढल्या आणि तो मालिकावीर ठरला आहे. पण त्याचबरोबर एक अनोखा विक्रम अश्विनने आता आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत भारताकडून कसोटी मालिकेत २५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स मिळवण्याचा विक्रम अश्विनच्या नावावर आहे. अश्विनने ही किमया सहा वेळा केली आहे. आतापर्यंत भारताकडून कसोटी मालिकेत २५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स अश्विनपेक्षा कोणीही घेतलेल्या नाहीत. त्यामुळे अश्विनच्या नावावर हा एक अनोखा विक्रम झाला आहे.
अश्विन हा भारताकडून सध्या फक्त कसोटी क्रिकेट खेळतो. पण कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी तो हुकमी एक्का आहे. कारण कसोटी सामना भारतात असो किंवा परदेशात अश्विन हा भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरला आहे. भारतामध्ये तर अश्विन हा ‘दादा’ गोलंदाज आहे आणि त्याला दुसरा पर्यायही नाही. पण परदेशात जिथे खेळपट्टी फिरकीला पोषक नसते तिथेही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जेव्हा भारताला विकेट मिळत नव्हती तेव्हा अश्विन भारताच्या मदतीला धावून आला होता. या मालिकेत सर्वाधिक बळी मिळवण्याचा मानही अश्विनने पटकावला आहे. त्यामुळे आता विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पण त्यापूर्वी होणाऱ्या आयपीएलमध्ये अश्विनच्या गोलंदाजीबरोबरच फलंदाजीवरही सर्वांच्या नजरा नक्कीच असतील.